जामखेड प्रतिनिधी
ईव्हीएम मशीनवर निवडणुका घेण्यास सुरुवात झाल्यापासून अनेकदा त्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. ईव्हीएममध्ये फेरफार करुन एकाच पक्षाकडे मतं वळवली जात असल्याचा आरोप अनेकदा झाला. त्यामुळे पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणीही मुस्लिम विकास परीषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष शेरखान अकबरखान पठाण यांनी केली आहे.

महाराष्ट्र मुस्लिम विकास परीषद ही सर्व समाज्यात एकता व अखंडता निर्माण व्हावी यासाठी काम करते याच अनुषंगाने महाराष्ट्र मुस्लिम विकास परीषद जामखेड च्या वतीने शहरातील खर्डा चौक या ठिकाणी अहमदनगर चे जिल्हा कार्याध्यक्ष शेरखान अकबरखान पठाण यांनी समाज्यात सलोखा निर्माण व्हावा यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते .

यावेळी उपस्थित कुडल राळेभात, हाजी नादीर, महाराष्ट्र मुस्लिम परिषद ता अध्यक्ष ताहेर खान, अरिफ बागवान (बबु बागवान) हाजी शमा वकील, रफिक तांबोळी, जुबेर भाई शेख, जावेद भाई शेख, अब्दुल शेख वकील यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पुढे शेरखान पठाण यांनी मोदी सरकार टीका करताना सांगितले की मोदी सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. शेतकरी उपाशी तर व्यापारी तुपाशी अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मोदी सरकार व्यापाऱ्यांचे सरकार आहे. महागाई ने गरीब जनता होरपळून गेली आहे त्यामुळे भविष्यात या सरकारला साथ न देता महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार साहेब यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहून त्यांना पाठबळ देऊ. मुस्लिम मुलांकडे पहाण्याचा दृष्टीकोन सर्वांनी बदलला पाहिजे. कुठलाही अनुचित प्रकार घडला तर मुस्लिम समाजाच्या मुलांना टार्गेट केले जाते हे चुकीचे आहे. कारण समाज कंटकांना कुठली जात नसते त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण ज्याचा काही दोष नाही अशांची सुटका झाली पाहिजे. त्यामुळे अन्यायाविरुद्ध मुस्लिम विकास परीषद कुठल्याही जाती धर्माच्या लोकांन सोबत खंबीरपणे उभी राहिल असे मत देखील मुस्लिम विकास परीषद जामखेड चे जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष शेरखान अकबरखान पठाण यांनी व्यक्त केले.





