जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील नागेश विद्यालयाच्या रस्त्यावर असलेल्या एका प्रार्थना स्थळाशेजारी आपसातील भांडणा वरून एकाने हवेत गोळीबार केला. मात्र या गोळीबाराने परीसरात घबराटीचे वातावरण आहे. घटनेबाबत जामखेड पोलीस स्टेशन अद्याप कोणतीच तक्रार दाखल झाली नाही. अगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात मात्र जोरदार चर्चा चालू आहे.
जाहीरात
जामखेडमध्ये अवैद्य शस्त्र मोठ्या प्रमाणात असुन अनेक जण दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. या पुर्वी देखील शहरात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. जामखेड शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश विद्यालयाच्या रस्त्यावर असलेल्या एका प्रार्थना स्थळा शेजारी दोघा जणांचे आपसात भांडण झाले. या भांडणाच्या रागात यातील एका जणाने आपल्या कडील आसलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला. तसेच सदर घटना घडल्यानंतर गोळीबारातून निकामी झालेली पुंगळी गोळीबार करणारा घेऊन गेला आहे.
गोळीबाराच्या घटनेची शहरात जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली आहे. गोळीबार झाल्या नंतर परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दोन तीन वर्षात वेळोवेळी जामखेड शहरात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. अनेक जणांन कडे बेकायदेशीर गावटी कट्टे असुन याची शोधमोहीम घेण्याची गरज आहे. गोळीबार प्रकरणी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या बरोबर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अद्याप गोळीबार ची घटना कोठे घडली या बाबत काही माहिती मिळू शकली नाही तसेच कोणी तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे ही आफवा आसण्याची शक्यता आहे.





