जामखेड प्रतिनिधी
मोटारसायकलस्वार आपली मोटारसायकल जातेगाव रस्त्यावर आडवी लावुन थांबला आसता एस टी वाहकाने मोटारसायकल बाजुला घे म्हणाल्याचा राग आल्याने मोटारसायकल चालकाने एस टी वाहकास मारहाण करून अंगावरील शर्ट फाडला. या प्रकरणी मोटारसायकल चालकाविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाहीरात
पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की दि ३१ रोजी फीर्यादी वाहक आपल्या ताब्यातील एम एच २०, बी. एल. २०९६ पुणे – भुम ही एस टी बस घेऊन भुम कडे चालला होता. यावेळी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही बस जातेगाव कडे जात आसताना मोटारसायकल चालक त्या कडील मोटारसायकल क्र. एम.एच १२ के एच ९१७२ ही खर्डा जातेगाव रोडवरील मोहरी जवळ रोडवर उभी करून रोडच्या मधोमध थांबला होता. या वेळी फिर्यादी एस बस वाहक यांनी त्यास मोटारसायकल रस्त्याच्या बाजुला घे आसे म्हणाला. त्यामुळे आरोपीस राग आल्याने त्याने फिर्यादी एस टी वाहकास शिवीगाळ करुन एस टी बस वाहकास आरोपीने त्यांचे शर्टची कॉलर पकडुन डोक्यात हताने चापट मारली व फिर्यादीचा टी शर्ट ओढुन फाडला. तसेच त्यावेळी फिर्यादीचे खिशातील १०० रूपयेची एक नोट गहाळ झाली व ५० व १० रूपये दराच्या एक एक नोट फाटली. तसेच त्याने फिर्यादीला मारण्यासाठी दगड हतात घेवुन तुला जिवच मारतो अशी धमकी दिली.
यानंतर फीर्यादी एस टी वाहक मनोज खवले याने लगेच आपली एस टी बस ही जामखेड पोलीस स्टेशनला आणली. एस टी बस वाहक फीर्यादी मनोज जगन्नाथ खवले वय ३२ वर्ष धंदा नोकरी, वाहक नं २५३२५ रा. हतोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मोटारसायकलस्वार याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि बडे हे करत आहेत.






