जामखेड प्रतिनिधी

३१ मे रोजी चौंडीत येणाऱ्या लाखो लोकांसाठी चौंडी हे गाव स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने चौंडी येथे स्वच्छता मोहीम राबवुन एक वेगळा आदर्श निर्माण केला. तसेच कार्यक्रम संपल्यानंतरही पुन्हा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आसल्याचे या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

स्वच्छता हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्ती आहे. स्वच्छता केवळ शासकीय कार्यालये, महापालिका, नगरपरिषद कींवा ग्रामपंचायत यांचीच जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. महात्मा गांधीजींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले त्यात त्यांनी राजनैतिक स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता महत्त्वाची असल्याचे सांगितले.

याच अनुषंगाने राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून सुशोभीकरण, रंगरंगोटी, डागडुजी तसेच स्वच्छता मोहिम व डेकोरेशन मंडप सह जोरदार जय्यत तयारी केली आहे. राज्यभरातून लाखो भाविक भक्त येणार आहेत त्यामुळे चौडी परिसर हा स्वच्छ व सुंदर असावा म्हणून जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तसेच कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना, कर्जत नगरपंचायत, कर्मचारी, नगरसेवक, व सर्व नगरअध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांच्या वतीने चौंडी परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. सकाळी व सायंकाळी दररोज प्रत्येक कार्यकर्ता हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिम राबवत आहे. त्यामुळे चौंडी येथिल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर परीसर स्वच्छ व सुंदर दिसत आहे. तसेच कार्यक्रम संपल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस चौंडी परीसराची संपुर्ण स्वच्छता करणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here