जामखेड प्रतिनिधी

३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवास साजरा होणार आहे. मात्र प्रत्येकाने हा आहील्यादेवी जयंती उत्सव आपल्या घरा घरात साजरा करावा असे आवाहन जामखेड चे भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मोहन (मामा) गडदे यांनी केले आहे.

ADVERTISEMENT

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत. कुशल प्रशासक व आदर्श न्याय पद्धतीच्या जोरावर त्यांनी रयतेच्या जगण्याचा खऱ्या अर्थाने राम आणला. जेंव्हा हिंदुस्तान परकिय राजवटीमुळे शंत खंडित झाला होता. त्यास अखंडित ठेवण्याचा काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. या खंडप्राय देशाच्या प्रत्येक भौगोलिक स्थानावर त्यांनी अनेक मंदिरांची निर्मिती केली व शेकडो मंदिरे जनार्धन जीनौद्रधार केला व हिंदू संस्कृतीला पुनर्जीवित करत भारत भूमीला आत्मसन्मान मिळवून दिला आहे.

ADVERTISEMENT

जामखेड चे भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मोहन गडदे यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी घरा घरात व गावा गावात साजरी करावी या मध्ये आपण प्रत्येकाच्या घरात राजमाता आहील्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पृष्प आर्पण करुन प्रतिमा पुजन करावे आणि समतेचे प्रतिक पिवळे निशान कींवा होळकरांचे निशान घरावर कींवा अंगणात फडकावे. तसेच या पवित्र सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करावेत हेच खरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन ठरेल.

अशा या महान प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेर जन्मस्थान अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड ता. चौंडी हे आहे.महाराष्ट्रात जन्माला येणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची चौंडी येथे जयंती दर वर्षी मोठया उत्साहात साजरी होत आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानला नवी दिशा दिली. देशाला अखंडित ठेवले. त्यांच्या महान स्मृती पुढे नतमस्तक होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरा घरात गावा गावात साजरी करा असे आवाहन जामखेड भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मोहन (मामा) गडदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here