जामखेड प्रतिनिधी : १५ मे
महाराष्ट्रातील आदरणीय नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्यावर अगदीच खालच्या पातळीवर टीका केली म्हणून
स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कुठल्याही स्तरावर जाणारी केतकी चितळे या माथेफिरू महिलेवर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी निषेध नोंदवून तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने जामखेड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही तिव्र निषेध व्यक्त करत पोलीस स्टेशनला निवेदन देऊन केतकी चितळे हीच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, संजय वराट, राजेंद्र पवार, उमर कुरेशी, वैजनाथ पोले,अमित जाधव राजेंद्र गोरे, हरिभाऊ आजबे,चंद्रशेखर नरसाळे, इस्माईल सय्यद,प्रा. राहुल आहिरे, निखिल घायतडक, प्रकाश सदाफुले, देविदास बादलकर, आदेश सरोदे, जुबेर शेख, राहुल उगले, प्रदीप राळेभात, अनील रेडे, बाबासाहेब मगर, रोहन पवार, योगेश पवार प्रवीण उगले, जुबेर शेख, संजय डोके, दिगंबर चव्हाण, भाऊसाहेब कचरे ,महेंद्र राळेभात, हरिभाऊ बेलेकर, हर्षल डोके, जावेद शेख आदी कार्यकर्ते उपस्थित
ADVERTISEMENT
होते.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की.
आधीच कॅन्सर सारख्या महाभयंकर आजाराला तोंड देत देशासाठी पहाडासारखे उभे असलेले देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचे वर आक्षेपार्ह कविता किंवा विधान करणारी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कुठल्याही स्तरावर जाणारी केतकी चितळे या माथेफिरू महिलेने समाज भावना भडकवण्याचे काम केले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावाचा संत साहित्याच्या भाषेचा गैरवापर करून सर्वसामान्य जनता, शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते व समाजसेवक व पवार साहेबांना मानणारी गोरगरीब जनता यांच्यामध्ये नाराजीची व संतापाची लाट उसळली आहे. तिच्या पोस्टमुळे ब्राह्मण व इतर समाज यांच्यामध्ये द्वेष, तिरस्कार,तेढ व वैमनस्य निर्माण होण्यास होण्यासाठी जाणीपूर्वक ही पोस्ट केले आहे. पोस्ट करणारी ही महिला विकृत चाळे करून जगणारी आहे की तिचे मागे कोणी माथेफिरू आहे याचा तपास करण्यासाठी तिच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे म्हटले आहे आहे.





