जामखेड व खर्डा शहरांच्या
जामखेड प्रतिनिधी
जामखेड व खर्डा येथील शहरातुन जाणार्या रस्त्यांसाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून १५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही रस्ते फोरलेन आसुन मध्ये दुभाजक व झाडांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे जामखेड व खर्डा शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
आमदार रोहित पवार हे जामखेड व कर्जत च्या विकासासाठी कायमच प्रयत्नशील असतात. त्यातच आता आमदार रोहित पवार यांनी खर्डा व जामखेड येथील शहरातुन जाणार्या रस्त्यांसाठी १५ कोटींचा निधी आणला या मध्ये जामखेड शहरातील करमाळा चौक ते पुढे जगदंबा मंगल कार्यालय पर्यंत १२ मिटर रस्ता चारपदरी होणार आहे. या मध्ये दोन्ही बाजूला साडेपाच मिटर रुंदीच्या डांबरी धावपट्टया आहेत. मध्यभागी एक मिटर रुंदीचे दुभाजक टाकण्यात येणार आसुन या दुभाजकाच्या मध्ये झाडे लावुन सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच एवन कॉर्नर ते धाकटी नदी पर्यंत भुमिगत गटार होणार आहे.
खर्डा येथील देखील याच नीधी मधुन रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. या मध्ये सिताराम गड खर्डा रोड ते खर्डा कील्ला अशा १४ मिटर लांबीच्या रस्त्यामध्ये साडेपाच मिटर लांबीचे दोन्ही बाजुने डांबरी पट्ट्या आहेत. मध्यभागी एक मिटर रुंदीचे दुभाजक टाकण्यात येणार आसुन या दुभाजकाच्या मध्ये देखील झाडे लावुन सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तसेच याच कामामध्ये खर्डा येथील कैतुका नदीवर नवीन पुल बांधुन लांबी व उंची वाढवण्यात येणार आहे. तसेच खर्डा ते जामखेड रस्त्याच्या लांबीतील खराब पॅचेस व दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणच्या रस्त्याच्या कामामुळे जामखेड व खर्डा शहरातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.






