जामखेड प्रतिनिधी
जामखेड ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी कामगार गौतम साठे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्यांना मद्यप्राशन करून शिवीगाळ व दमदाटी केली या प्रकरणी त्याच्यावर योग्य कारवाई करावी यासाठी आरोग्य कर्मचारी यांनी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
या बाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की दि १२ मार्च रोजी सकाळी मी ग्रामीण रुग्णालयात असताना गैतम साठे रा. नान्नज हा त्या ठिकाणी मद्यपान करून आला व मोठमोठ्या शिवीगाळ करु लागला त्या वेळी मी त्याला शिविगाळ का करतो असे विचारले असता तो मला म्हणाला की तुला काय करायचे ते कर माझ्या नादी लागला तर जीवे मारुन टाकीन असे म्हणुन शिवीगाळ करु लागला. तेंव्हा त्या ठिकाणी आसलेल्या आरोग्य कर्मचारी यांनी समजावून सांगण्यास गेले असता त्यांना पण त्याने शिविगाळ केली व माझ्या नादी लागलातर तुम्हाला नोकरी करुन देणार नाही. या अनुषंगाने गौतम साठे या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरसह कर्मचाऱ्यांनी केली आहे.
सदर तक्रारी अर्जावर ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ शाम जाधवर, माळी एस. ई., वनवे, म्हेत्रे, डॉ. खराडे, मंडलेचा, रोहित होडशीळ, महेश मोहळकर, बेग, घायतडक, उगले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. तसेच याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला दिल्याची माहिती तक्रारदार ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ शाम जाधवर यांनी सांगितले.






