जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगरपरिषदेच्या विविध समस्या, रस्‍त्‍याला आडवे येत आसलेले जीओ कंपनीचे व लाईट चे पोल तसेच मुख्याधिकारी यांच्या तक्रारी विरोधात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे पांडूराजे भोसले यांनी सुरू केलेले उपोषण अखेर लेखी अश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

याबाबत नगरपरिषदमार्फत दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, जीओ कंपनीने केलेल्या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने याबाबत कंपनीने केलेल्या कामाची चौकशी करण्यात येईल. कंपनी विरोधात कारवाई करणेबाबत दोषी अढळुन आल्यास पोलीस स्टेशनला गुन्हा करण्यात येईल. तसेच पुढील कारवाई करिता जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे कार्यालयासही अहवाल पाठविण्यात येणार आहे. शहरातील सर्व स्वच्छतागृहे व लघुशंका करण्याचा जागा दुरुस्ती करण्याची कामे नगरपरिषदेने हाती घेतलेली आहेत. शहरातील बाजारतळ येथील आसलेले महिलांसाठी चे शौचालयाचे काम मंजूर असून लवकरच शौचालयाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. मुख्याधिकारी यांना कार्यालयीन कामाच्या सोयीसाठी नागरिकांना भेटण्यासाठी ४ ते ५ अशी होती. आता नागरिकांनी याबाबत केलेल्या मागणीनुसार हि वेळ दुपारी २.०० ते कार्यालय संपेपर्यंत ठेवण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबधीत मुददयांबाबत दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे की, शहरात होणारा मुख्य वर्दळीचा बीड कॉर्नर ते नवीन पोलिस स्टेशन रस्ता (लवकरात लवकर व उत्कृष्ठ दर्जाचे झाले पाहिजे ) सदरचे काम IRC मानकाप्रमाणे सुरु त्याप्रमाणे गुणवत्ता पुर्वक पुर्ण करण्यात येणार आहे . तसेच सदर रस्त्याचे रुंदीकरणाच्या रुंदीमध्ये अडथळा येणार्‍या विजेचे खांब काढण्याचे काम २-३ दिवसात महावितरण विभाग , जामखेड यांचे मार्फत सुरु होणार आहे .

महिलांसाठी जामखेड शहरात स्वच्छतागृह बांधण्याबाबत नगर विकास विभागाकडुन जामखेड शहरात स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. हे काम मंजुर असुन या कामांची कार्यान्वीन यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे . सदर कामासाठी बाजार तळ येथील जागा नगर परिषदेकडुन उपलब्ध करुन दिली नसल्यामुळे सदर काम अदयापपर्यंत हाती घेण्यात आलेले नाही. सद्यस्थितीत नगर विकास विभागाकडुन जामखेड शहरात बाजारतळ येथे अंदाजीत किमंत ९ कोटी इतकी किंमत असलेले शॉपिंग सेंटर काम मंजुर असुन सदर कामात स्वच्छतागृह बांधणे हे काम करण्यात यावे असे नगर परिषदेकडुन मागणी केल्याप्रमाणे स्वच्छतागृह बांधणे असा कामाचा वाव शॉपिंग सेंटर या कामाचे अंदाजपत्रकात अंतर्भूत करण्यात येणार आहे . सदर कामाची निविदा प्रक्रिया सदयस्थितीत प्रगतीत असुन ठेकेदार निश्चिती व कार्यारंभ आदेश झाल्यानंतर सदरचे काम तातडीने हाती घेवून पुर्ण करण्यात येईल. अशा पध्दतीने विविध मागण्याबाबत तिन्ही विभागामार्फत योग्य ती अमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी काल दि. २५ फेब्रुवारी रोजी सुरू केलेले अमरण उपोषण व अंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, नय्युम शेख, प्रविण बोलभट, संजय काशिद, प्रा. विकी घायतडक, अॅड ऋषिकेश डुचे, जामखेड नगरपरिषदचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, विज वितरणाचे अभियंता युवराज परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी सह अदि पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here