जामखेड प्रतिनिधी

पुढचा काळ हा प्रचंड संघर्षाचा आहे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येकाने आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे आता आंदोलन अन केसेस नको, युवकांनो उद्योजक बना असे मत मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष प्रविण दादा गायकवाड व्यक्त केले.

जामखेड येथे शिवजयंती निमित्ताने मराठा सेवा संघ संभाजी-ब्रिगेड व जिव्हाळा फाऊंडेशनचे वतीने बिझनेस काॅन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. सदर काॅन्फरन्सचे उदघाटन बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार यांच्या हस्ते झाले. कृषिभुषण महेश कडूस, उद्योजक संतोष पवार, उद्योजक डॉ.महेंद्र शिंदे, बॅंक ऑफ महाराष्ट्राचे आबासाहेब शिंदे, आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अरुण निमसे यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी नव उद्योजक व पत्रकारांचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. सदर प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी, जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समिती सभापती सुर्यकांत मोरे, कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष राहुल उगले,मराठा सोयरिक ग्रुपचे अशोक कुटे गुलाबशेठ जांभळे, विनायक राऊत,खलील मौलाना, जावेद सय्यद, प्राचार्य विकी घायतडक, नामदेव राळेभात, संदिप बोराटे,अॅड.हर्षल डोके, नगरसेवक पवन राळेभात,सौ.वर्षा पवार,सौ.विजया नलवडे,राधिका राऊत इ.उपस्थित होते.

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की जामखेड सारख्या दुष्काळी भागात बिझनेस काॅन्फरन्स आयोजित करणे म्हणजे आजच्या व उद्याच्या पिढीतील नवीन उद्योजकांना प्रेरणा देण्याचे मोठे कार्य आहे. ज्याला उद्योजक व्हायचं असेल त्याने राजकारण, क्रिकेट, हाॅलावुड-बॉलीवुड , नेटफ्लीक्स यावर चर्चा करण्यापेक्षा उद्योग बिझनेस यावर चर्चा करावी असे विचार संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

मराठा ही खूप व्यापक आणि सर्वसमावेशक अशी ओळख आहे. महाराष्ट्राबाहेर, देशाबाहेर महाराष्ट्रातील सर्व लोकांना मराठा म्हणून ओळखले जाते. भविष्यात ही मराठा कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी म्हणून ओळखली जावी असे माझे स्वप्न आहे. त्यासाठीच “अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला” ही संकल्पना घेऊन संभाजी ब्रिगेडची भविष्यातील वाटचाल व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष अवधूत पवार व तालुकाध्यक्ष कुंडल राळेभात यांनी परिश्रम घेतले. प्रस्ताविक जिव्हाळा फाऊंडेशन व मराठा सेवा संघ संभाजी-ब्रिगेडचे मार्गदर्शक प्रा.मधूकर राळेभात यांनी केले. सुत्रसंचलन प्रा.राम निकम तर आभार प्रा.शहाजी डोके यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here