जामखेड प्रतिनिधी

बीड कॉर्नर ते पोलीस स्टेशन या चालु आसणार्‍या रस्त्यावरील आडवे येत आसलेले लाईट चे पोल जाग्यावर ठेऊन काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. मात्र तरी देखील पोल जाग्यावर ठेऊन रस्त्यावर खडी टाकण्यातचे काम सुरू आहे. आडवे येत आसलेले लाईट चे पोल तातडीने बाजुला हटवण्यात यावे अशी मागणी जामखेड येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने दिलेल्या निवेदनात केली आहे.

जामखेड शहरातील महत्त्वाच्या द्रृष्टीने समजल्या जाणाऱ्या बीड कॉर्नर ते नवीन पोलिस स्टेशन पर्यंत होणार्‍या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. या रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसवण्यात येणार आहेत. या रस्त्यावर पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, कृषी कार्यालय, तलाठी कार्यालय, भुमिअभिलेख कार्यालय शाळा व कॉलेज आहे. तसेच पुढे रहदारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रोडचे काम चालु झाले असुन तेथे येणारा अडथळा लाईटचे पोल व एका जीओ कंपनीचे पोल तसेच बीड कार्नरला असणारा मोठा गटाचीचा खड्डा अडवा येत आहे. या मुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी अडथळा ठरत आसलेले सर्व पोल हटवण्यात यावेत यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड च्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद, तहसील कार्यालय व महावितरण विभागाच्या कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

दोन महिन्या पुर्वी शहरातील रोडवर जीवो कंपनीचे पोल उभे केले आहेत त्याची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेचे मिनीनाथ दडंवते यानां विचारले असता त्यांनी सांगितले की पोल रोवण्यासाठी कसलीही परवानगी जिवो कंपनीला दिली नाही. त्यांनी प्रांत व कलेकटर याच्या परवानगी ने काम सुरु झाले असे आम्हांला जिवो कंपनीच्या कामगारांनी सांगितले.

शहरात कुठलही खोदकाम करायचे असेल तर नगरपरिषदेला कर भरुन करावे लागते. कुठल्याही लोकप्रतिनिधी ला काही काम करायचे असेल तर नगरपरिषदेचा परवाना घेउन (एन. ओ. सी ) करावी लागते मग नेमक शहरात मुख्याधिकारी यांनी माहिती असताना देखील त्यांनी जिवो कंपनीचे काम का थाबंवल नाही? यातच शंका निर्माण होण्यासारखे घडले आहे. शहराच्या बाजुने गँस पाईपलाईन गेली त्याचा कर घेतलाय का? मुख्याधिकारी यांनी आम्हांला प्रांत कलेक्टर याचीं नावे सांगुन वेळ ढकलली पण मी जेव्हा त्यांनी दिलेले परवानगी ची प्रत मागितली त्या वेळी त्यांनी विषय बदलला. व तातडीने जेसीबी च्या सहाय्याने अचानक काही पोल काढून टाकले.

नगरपरिषद आहे गेली वर्ष दिड नगरसेवकांचा आधिकार संपलेला असल्यामुळे सध्या प्रशासक म्हणून मीनीनाथ दंडवते काम पाहताय त्यांना जाब विचारायला स्थानिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी नसलेल्या मुळे सध्या मुख्याधिकारी यांच्या मार्फत मनमानी काराभार चालु आहे. कुठलेच काम पुर्ण करत नाहीत. अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत आता विना परवाना बसवलेले जिवो चे पोल बसवले आहेत याच्यांवर कारवाई होणार का? का नुसतेच नागरिकांनी रस्त्यावर अडथळा निर्माण केला म्हणून लगेच त्यांच्यावर गुन्हा केला जातो. मग जीओ कंपनीच्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड च्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here