जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रीय मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण (भारत) या संघटनेच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी जामखेड चे प्रशांत हिरवे यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री महेश मीना व महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख सौ सुवर्णा माने यांनी दिली.
राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश मीना, राष्ट्रीय महासचिव रमेश गंगणे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण कुमार चित्ते, उपाध्यक्ष अविनाश ढगे, महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुवर्णा माने, आदी मान्यवरांनी अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी प्रशांत हिरवे यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. प्रशांत भाऊ हे मूळ जामखेड तालुक्याचे रहिवासी असून गोरगरिबांना बद्दल आपण त्यांचे काहीतरी देणे लागतो ह्या भावनेने व गोरगरीबांचे कष्ट निवारण करण्यासाठी खूप धडपड करत असतात आणि इथून पुढेही करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. गोरगरिबांच्या हॉस्पिटलचा प्रश्न असेल व अनेक समस्या साठी व गोरगरिबांच्या निवारणासाठी काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत हिरवे हे सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क असून सोशल माध्यमात पण चांगले नेटवर्किंग आहे. तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवून सर्व सामान्य जनतेला समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यामुळे जामखेड तालुक्यातील नागरिकांसह नगर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण (भारत) संघटनेने त्यांची अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड केली आहे.






