जामखेड प्रतिनिधी

अहमदनगर सारख्या ठिकाणी जाऊन उपचार घेऊन रुग्णांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. याच अनुषंगाने जामखेड येथील इंदिरा हॉस्पिटलमधे नुकतीच कोरोना रुग्णांसाठी महात्मा फुले योजनेचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा मोठा आर्थिक भार कमी होणार आहे अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ सुहास सुर्यवंशी यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी मुळे लोकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अनेक लोक आर्थिक संकटात सापडले आहेत. परीणामी अहमदनगर सारख्या ठिकाणी रुग्णांना उपचार करण्यासाठी आर्थिक खर्च परवडत नाही. त्यामुळे जामखेड येथील इंदिरा हॉस्पिटलमधे नुकतीच कोरोना रुग्णांसाठी महात्मा फुले योजना सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती हॉस्पिटल चे संचालक डॉ सुहास सुर्यवंशी यांनी दिली आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर ही योजना सुरू करण्यात आली आहे. या मध्ये ४० बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेत ओमायक्रॉन, डेल्टा कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या योजनत पिवळे शिधापत्र, केसरी शिधापत्र व पांढरे शिधापत्र चालनार आहे. खास करुन कोविड च्या लहान मुलांवर देखील या ठिकाणी उपचार करण्यात येणार आहेत. या योजने अंतर्गत नियम व अटींचे पालन करुन रुग्णांना सेवा देण्याचे काम करण्यात येईल असे डॉक्टरांनी सांगितले.

या योजनेचे उद्घाटन नुकतेच जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या हस्ते संपन्न झाले. या योजने दरम्यान डॉ सुहास सुर्यवंशी (बालरोग तज्ज्ञ), डॉ पल्लवी सुर्यवंशी (स्त्री रोग तज्ञ), डॉ राजकुमार गायकवाड, (एम डी मेडिसीन) व डॉ प्रविण जगताप (आय सी यु तज्ञ) अशी तज्ञ टीम कोविड रुग्णांच्या देखरेखीखाली असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here