जामखेड प्रतिनिधी
झिक्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सहशिक्षीका व केंद्र प्रमुख यांना विणाकारण त्रास देण्याचे काम विरोधकांनी सुरू केले आहे. शिक्षीका व केंद्र प्रमुख यांनी हे आंदोलन घडवुन आणले नसल्याने त्यांच्यावर कारवाई करु नये. तसेच झिक्री शाळेच्या निर्लेखणाची प्रक्रिया नव्याने करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा झिक्री चे ग्रामस्थ श्रीधर जीवडे सह ग्रामस्थांनी केली आहे.
या बाबत झिक्री गावचे ग्रामस्थ श्रीधर जीवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की गेल्या चार वर्षांपासून झिक्री गावात संघर्ष सूर आहे तो झिक्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या मुळे त्यामुळे आम्ही त्यांची बदली करावी म्हणून शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत आहेत. संबंधित मुख्याध्यापीका यांची बदली करण्यासाठी आम्ही २३ डीसेंबर रोजी पंचायत समितीमध्ये निवेदन दिले होते. या निवेदनात जर मुख्याध्यापिका यांची बदली केली नाही तर दि ३ जानेवारी २०२२ रोजी शाळेस कुलुप ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र ३ तारखेपर्यंत प्रशासनाकडु कसलेच सहकार्य ग्रामस्थांना मिळेले नाही. तसेच मुख्याध्यापीका यांनी सांगितले की शाळेला एकच कुलूप होते. व ते कुलुप उघडून शाळेतील काही सामान चोरीला गेले असा आरोप केला होता. मात्र हे आरोप खोटे असुन या ठिकाणी शाळेला दोन कुलपे लावली होती. यातील एका कुलपाची चावी स्वतः गटविकास अधिकारी यांनी सहशिक्षीका यांच्या कडे दिली होती व कुलुप उघडायला लावले व दुसरे लावलेले कुलुप गावच्या सरपंच यांनी उघडले होते. या वरुन शाळेच्या वर्गाला दोन कुलप होती तसे ग्रामस्थांनी केलेल्या मोबाईल च्या व्हीडिओ शुटींग मध्ये देखील व्हीडिओ चित्रीकरण आहे.
तसचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झिक्री या शाळेत दुसर्या सहशिक्षीका गाडवे मॅडम आहेत त्यांना या प्रकरणात विणाकारण गोवण्यात येत आहे. या प्रकरणात त्यांना त्रास दिला जात आहे. तसेच त्या शाळा व मुलांनकडे देखील व्यवस्थित लक्ष देत आहेत. गावातील स्वयंघोषित दोन चार पुढारी यांनीच या प्रकरणाला राजकीय वळण दिले आहे असा आरोप ग्रामस्थ श्रीधर जीवडे यांनी पत्रकारांशी बोलताना केलि आहे.






