कर्जत प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथील विवाहित महिला उषा बापू कळसाईत वय 33 वर्ष यांनी पतीच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी टाकून आत्महत्या करण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पती बापू बबन कळसाईत याच्यावर कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विलास रामचंद्र कावरे राहणार धानोरा फकराबाद जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी उषा बापू कळसाईत हिचा विवाह कर्जत तालुक्यातील बाभूळगाव खालसा येथील बापू कळसाईत याच्यासोबत झाला होता. मात्र बापू यास दारूचे व्यसन असल्यामुळे तो सातत्याने दारू पिऊन त्यांची मुलगी उषा हीच मारहाण करत असे. पतीच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तिने अखेर विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली.






