कडा / वार्ताहर
————-
येथील अमोलक जैन विद्यालयाच्या परिसरात पंढरपुरवरुन देवदर्शन करुन गावाकडे येत असलेल्या सुमो वाहनाची अन् कड्याकडून भूमकडे जाणा-या स्वीप्ट कारची काल सायंकाळच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. या अपघातात वाहनचालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कडा येथील अमोलक जैन विद्यालयाच्या परिसरात गुरुवार दि. २३ रोजी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पंढरपुरवरुन देवदर्शन करुन गावाकडे येत असलेल्या सुमो (एम.एच. -२५-टी-०१८९) आणि कड्याकडून भूमकडे जाणा-या (एम.एच-२५-ए.एस.-२७९६) असा क्रमांक असलेल्या स्वीप्ट कारची येथील धोकादायक वळणावर समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात वाहनाचे प्रचंड नुकसान झाले असून वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत. या दोन्ही वाहनाच्या भीषण अपघातात इतर प्रवाशी मात्र सुदैवाने बालंबाल बचावले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, कडा पोलीस चौकीचे पोकाॅ. गंगाधर आंगरे, बंडू दुधाळ, मंगेश मिसाळ, चालक घोडके आदींनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतुकीची कोंडी दूर करुन वाहनातील प्रवाशांना मदत केली.
——%%—-++






