जामखेड प्रतिनिधी
निवारा बालगृह उभं राहिलं हे दानशूर व्यक्तींच्या मदतीने. पाडळी गावला देखील राजकीय वलय आहे. त्यामुळे तुम्ही पाडळी गावचे सरपंच अहात हे तुमचे भाग्य आहे. गरीबांना मदत केली. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे कारण संपत्ती कमवण्यापेक्षा गरीबांना मदत करणे हे कधीही चांगले आसते.
पाडळी गावचे सरपंच बाळासाहेब खैरे यांनी त्यांचा वाढदिवस अनाठायी ठिकाणी जाऊन, खर्च न करता ज्यांना मदतीची गरज आहे. आशा निवारा बालगृहातील अनाथ, निराधार, मुलांमध्ये येऊन आपला वाढदिवस साजरा केला.
यावेळी मोहन पवार, राजेंद्र पवार, महादेव खैरे, अविनाश बोधले, तुकाराम अंदुरे, गणेश हागवणे, राजाभाऊ शिरोळे, धनराज पवार, रोहित राजगुरू निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजीनाथ केसकर , तरडगावच्या सरपंच संगीताताई केसकर, राजू शिंदे, व विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक अँड.डॉ.अरुण जाधव म्हणाले की बालगृहात शिकणाऱ्या मुलांनी मोठे होऊन चांगले शिक्षण घेऊन अधिकारी बनलेले मला पाहायचे आहे, पुढील काळामध्ये निवारा बालगृहास एक मॉडेल बालगृह म्हणून विकसित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ज्या मुलांना आई-बाबा माहित नाहीत त्या मुलांचे आई-बाबा होण्याचे काम आम्ही करतो. तसेच ज्या निराधार व वृध्द महीलांना देखील देखील कोणी संभाळ केला नाही तर या ठिकाणी आईच घर तयार केले आहे या ठीकाणी येऊन रहावे असे आवाहन देखील अॅड अरुण जाधव यांनी केले आहे. यावेळी संस्थेची पूर्ण माहिती संस्थेचे संचालक बापू ओहोळ यांनी दिली व सुत्र संचालन प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण सर यांनी केले,






