जामखेड प्रतिनिधी
एस टी अगाराच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर अद्याप कसलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे जामखेड अगाराच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा चौथा दिवस असुन दिपावली सणा च्या काळात मात्र प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. जीव धोक्यात घालून सध्या प्रवासी खाजगी अवैद्य वाहातुकीतुन प्रवास करत आहेत.
महाराष्ट्रात गेल्या पंधरा दिवसांपासून अनेक एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या आगारात संप पुकारला आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. जामखेड अगाराच्या कर्मचाऱ्यांनी देखील या संपात उडी घेतली असुन गेल्या चार दिवसांपासून हा संप सुरू आहे. चार दिवसात एकही एस टी बस बाहेर पडली नसल्याने जामखेड अगाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या संपावर तोडगा निघणार कधी असा प्रश्न प्रवाशांसमोर पडला आहे. एन दिवाळीत हा संप पुकारल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सध्या दिवाळी सणानिमित्त अनेक प्रवासी बस ने प्रवास करत असतात. मात्र एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आसल्याने हे प्रवासी खाजगी अवैद्य वाहातुकीतुन आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. तरी लवकरात लवकर शासनाने तोडगा काढुन बस सेवा सुरळीत करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
जामखेड अगाराच्या कर्मचाऱ्यांची नुकतीच माजी पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनी भेट घेऊन भाजप च्या वतीने या संपाला पाठिंबा दिला आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, व प्रहार संघटना जामखेड यांच्या वतीने कर्मचाऱ्यांची भेट घेतली व या संपाला जाहीर पाठिंबा दिला आहे.






