अहमदनगर प्रतिनिधी 

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आय सी यु विभागाला भीषण आग लागली आहे. जिल्हा रुग्णालयातील आयसीयू रुग्णालयात ही आग लागली असून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आयसीयू वॉर्डात ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी एकूण 20 रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. यासोबतच रुग्णालयातील नर्सेस, वॉर्ड बॉय आणि डॉक्टरांच्या मदतीने रुग्णांना इतरत्र हलविण्यास सुरुवात केली. सध्या आग नियंत्रण आली आसली तरी या आगीच्या दुर्दैवी घटनेत काही जणांचा मृत्यू झाला आसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर तेरा ते चौदा जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती समजताच आ. संग्राम (भैय्या) जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here