जामखेड प्रतिनिधी
बारामती अग्रीकल्चर डेव्हलपमेंट च्या विश्वस्त सौ.सुनंदा पवार यांच्या संकल्पनेतून खर्डा येथील कौतुका नदीचे सुशोभीकरण चे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे नदीने मोकळा श्वास घेतला आहे.
नदीच्या परिसरातील मोठ्या बाभळी व इतर झाडांनी व्यापला होता. मोठ्या नदीचे रूपांतर छोट्या डबक्यात झाले होते,15 ऑक्टोबरला खर्डा किल्ल्यासमोर भारतातील सर्वात उंच स्वराज्य भगवा ध्वज बसविण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात खर्डा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहभागातुन स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्वराज्य ध्वजा मुळे सर्वत्र उसह जाणवत आहे. प्रत्येक वॉर्डातील महिला व पुरुष सकाळी आपआपला परिसर स्वच्छ करण्यास मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत,
त्यातच खर्डा गावाच्या प्रथम दर्शनी असणारी कौतुका नदीची फार दुर्दशा झाली होती परिसरात मोठ्या झाडांनी दुर्गंधी पसरली होती. नदी ही अरुंद होत चालली होती या नदीचे घाणीचे साम्राज्य पसरले होते. ही बाब सौ.सुनंदा पवार यांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने पोकलेनची व्यवस्था केली व स्वच्छता करण्यासाठी सुविधा निर्माण केली. त्या माध्यमातून नदिच्या पूर्ण परिसरातील झाडे काढण्यात आली व नदीचे खोलीकरण ही करण्यात आल्याने कौतुका नदीचे पात्र हे मोठे दिसू लागले आहे, खर्डा गावाच्या प्रवेशद्वारातच मोठी स्वच्छता दिसून येत आहे, यामुळे कौतुका नदीचे झालेले काम कौतुक करण्यासारखे झाले असल्याची चर्चा खर्डा ग्रामस्थां मधून बोलताना व्यक्त केली जात आहे. यासर्व कामामुळे खर्ड्याच्या कौतुका नदीने मात्र मोकळा श्वास घेतला आहे.






