जामखेड प्रतिनिधी
नान्नज येथे आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नान्नज यांच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत अहमदनगर येथील संदीप कुमार राठोड याने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला होता या स्पर्धेत एकुण 175 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेमध्ये अहमदनगर च्या संदीप कुमार राठोड अहमदनगर याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर किशोर विठ्ठल मरकड, पाथर्डी, द्वितीय क्रमांक, विक्रम लोखंडे, जामखेड तृतीय क्रमांक,
अखिल अविनाश जाधव, उस्मानाबाद चतुर्थ क्रमांक, बडे दामोदर नारायण पाचवा क्रमांक पटकावला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कर्जत – जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, सभापती सूर्यकांत मोरे, युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे, माजी उपसभापती दीपक पवार, नान्नजचे सरपंच महिंद्र मोहळकर, महारुळीचे सरपंच लक्ष्मण ढेपे, मार्केट कमिटीचे संचालक त्रिंबक कुमटकर, बोरल्याचे सरपंच दिलीप काकडे, नरेंद्र जाधव, अशोक पठाडे, गणेश चव्हाण, लियाकत शेख, प्रशांत कोळपकर, सागर पवार, आप्पा मोहोळकर ,गणीभाई पठाण, बाळू गोरे, किरण पवार, नदीम पठाण, संतोष मोहळकर, अखिल शेख, पांडुरंग चव्हाण, योगेश रजपुत, सादीक चाऊस, आदम शेख, कयूम शेख, मधुकर वारद, भुजंग दळवी, अशोक गाजरे, निलेश साठे, गणेश पवार. राम गाजरे, अरबाज शेख, पांडू मोहळकर आदींसह नान्नज परिसरातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी जामखेड, कर्जत, अहमदनगर, परांडा, उस्मानाबाद, बीड, लातूर, अकोले सह राज्यभरातुन स्पर्धक आले होते. यामध्ये मुलींचा सहभाग लक्षणीय ठरला. या स्पर्धेसाठी राष्ट्रवादीचे युवा नेते अमर चाऊस यांनी विशेष प्रयत्न केले.






