अरणगाव येथे पालघर ची पुनरावृत्ती टळली
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे पोलीस अधिकाऱ्यावर मॉब लिंचिग घटना घडल्यामुळे जामखेड तालुका हादरला आहे. जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील संतप्त झालेल्या २०० ते २५० लोकांच्या जमावाकडून बीड जिल्ह्यातील आष्टी येथील चौंघांना अरणगाव येथील स्टँडवर अमानुष मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.
या बाबत समजलेली माहिती अशी की आष्टी येथील कोंबडी व्यावसायिक विशाल कांबळे ,व त्यांचे नातेवाईक असलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे आणखी दोन नातेवाईक बरोबर घेऊन जामखेड तालुक्यात वंजारवाडी, फक्राबाद, अरणगाव या भागात गावरान कोबंड्या विकत घेण्यासाठी आले होते. पुन्हा ते गावाकडे परत निघाले असताना वंजारवाडी येथे दिवसा घरफोडीची घटना घडली असल्यामुळ तेथील ग्रामस्थांना त्यांचा संशय आला. अरणगाव येथे कांबळे यांच्या गाडीला वंजारवाडी येथील ग्रामस्थांनी आडवी गाडी लावून गाडी थांबली आणि गाडीवर मोठ मोठे दगड घालून गाडी फोडून या चौघांना गाडीच्या खाली घेऊन गज, काठ्या, लोखंडी राँड, व दगडाने जबर मारहाण करुन गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे.तसेच खिशातील पंन्नास हजार रुपये काढून घेण्यात आले आहे. या घटनेत विशाल काबंळे, कचरु निकाळजे,सुनील निकाळजे, किरण कांबळे हे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे ३० जना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामखेड पोलीस ठाण्यात विशाल कांबळे यांनी फिर्याद दाखल केली आहे हि घटना घडल्याची बातमी अरणगावचे सरपंच अंकुश शिंदे यांना समजली असता त्यांनी त्या जमावाच्या तावडीतून त्यांची सुटका करून हि बातमी जामखेड पोलीस स्टेशनला कळवली असता पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे घटनास्थळी येऊन या चौघाची चौकशी करून त्यांना उपचारासाठी जामखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सरपंच अंकुश शिदे व काही ग्रामस्थांनमुळे या चौघांचे प्राण वाचले अन्यथा पालघरची पुरनावृत्ती सारखी घटना घडली असती या घटने मुळे जामखेडे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.






