पारनेर प्रतिनिधी

पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या शाखेवर गोळीबार करीत अज्ञात दरोडेखोराने सुमारे ५ लाख रुपयांची रोकड भरदिवसा लुटूण्याची घटना शनिवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. दरोडेखोरांना विरोध करणारे शाखाधिकारी बाळासाहेब सोनवणे यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून छातीच्या खाली गोळी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या पारनेर ग्रामीण पतसंस्थेची नगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथे शाखा आहे. आज नेहमीप्रमाणे शाखा व्यवस्थापक बाळासाहेब सोनवणे व महिला कर्मचारी यांनी सकाळी १० वाजता शाखा उघडली. व्यवहार सुरळीत असताना थोडे निवांत झाले म्हणून शाखा व्यवस्थापक सोनवणे हे केस कर्तनासाठी बाहेर पडले असता दुपारी अडीच वाजता एक अज्ञात दरोडेखोर मोटरसायकलवर आला व हेल्मेट घालून त्याने शाखेत प्रवेश केला. त्याने महिला कर्मचाऱ्याच्या डोक्याला पिस्तूल लावले व रोकड माझ्याकडे जमा कर, असे म्हणू लागला. या दरम्यान महिला कर्मचाऱ्याची लहान मुलगी तेथे होती, ती बाहेर गेली व शाखा व्यवस्थापक सोनवणे यांना घडत असलेली हकीकत सांगितली. सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न करता शाखा गाठली. यावेळी दरोडेखोर व महिला कर्मचारी यांच्यात बाचाबाची सुरू होती. सोनवणे यांनी झाडू घेऊन दरोडेखोराला मारण्याच प्रयत्न केला. या दरम्यान दरोडेखोराने आपल्याकडील पिस्तुलाने सोनवणे यांच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी सोनवणे यांच्या छातीत घुसली, व ते खाली कोसळले.

रोखपाल महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तिच्या जवळील सुमारे ५ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. रोख रक्कम पाच लाख वीस हजार घेऊन आपली मोटारसयकल होंडा शाईन घेऊन पुण्याच्या दिशेने पोबारा केला असुन लुटमार व गोळीबार सी.सी.टि.व्हीत स्पष्ट दिसत आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे, सहा. पी.आय पवार, सहा. निरिक्षक मनोज मुढे, खंडेराव शिंदे यांनी घटना स्थळी भेट दिली व सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे लुटारुचा शोध घेतला जात आहे. यासाठी काही पथके बनवून विविध ठिकाणी रवाना केले आहेत. लुटारु पैसे चोरताना व गोळीबार करताना सीसीटिव्हीमध्ये स्पष्ट दिसत असून पोलिसांनी विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यासाठी पथके रवाना केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here