जामखेडमधील धक्कादायक प्रकार: जात पंचायतीच्या नावाखाली ५ लाखांची मागणी फेटाळल्याने कुटुंबाला बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील आराळे वस्ती येथे मी जात पंचायतीचा पंच आहे. मला तुमच्या मुलीच्या लग्नाचे पाच लाख रुपये द्यावे लागतील या मागणीवरून एका कुटुंबाला लोखंडी गज व दगडाने मारहाण करण्यात आली. या घटनेत चार जण जखमी झाले आसुन दोन जणांवर अहिल्यानगर येथिल जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बाबू तात्या शिंदे (वय ४९, रा. आराळे वस्ती, ता. जामखेड) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.

पोलीसांना कडुन मिळालेल्या माहितीनुसार दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता फीर्यादी बाबू शिंदे हे आराळे वस्ती, जामखेड येथे आपल्या घरासमोर असताना आरोपी वसंत तात्या लोखंडे, किरण वसंत लोखंडे, अक्षय वसंत लोखंडे, बाजीराव यलाप्पा लोखंडे, विलास यलाप्पा लोखंडे आणि सुनीता लक्ष्मण तासरजोगे हे सहा जण तेथे आले.

यावेळी वसंत तात्या लोखंडे यांनी आपण जातपंचायतीचा पंच असल्याचे सांगत, मुलीच्या लग्नाचे पाच लाख रुपये दिले नसल्याचे सांगून ते पैसे देण्याची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने त्या ठिकाणी वाद वाढला. यानंतर किरण वसंत लोखंडे याने हातातील लोखंडी गजाने बाबू शिंदे यांच्या डोक्यात मारून जखमी केले, तसेच बाजीराव यलाप्पा लोखंडे याने लाकडी दांडक्याने त्यांच्या पाठीवर व पोटावर मारहाण केली. फीर्यादी यांचा पुतण्या सागर बापु शिंदे याच्या डोक्यात लोखंडी गज मारुन गंभीर जखमी केले. आरोपी एवढ्यावरच थांबले नसुन फीर्यादी यांची पत्नी व भावजय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत एकुण चार जण जखमी झाले आसुन फीर्यादी बाबू तात्या शिंदे व सागर बापु शिंदे या दोघांवर अहिल्यानगर येथिल जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर फीर्यादी बाबू तात्या शिंदे यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार एकुण सहा जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच लाख रुपयांच्या मागणीवरून झालेल्या मारहाण व धमकीच्या या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय लोखंडे हे करित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here