Home क्राईम न्यूज जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथिल तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथिल तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथिल तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील एका २६ वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक आणि सुन्न करणारी घटना घडली आहे. महेश बिभिषण कुमटकर (वय २६, रा. राजेवाडी, ता. जामखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे राजेवाडी परिसर आणि नातेवाईकांमध्ये प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी (३१ ऑगस्ट २०२६) सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास बावी गावाच्या शिवारात परमेश्वर तुपेरे व नंदा घोडेस्वार यांच्या शेताच्या सामाईक बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला महेश कुमटकर याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना आढळून आला. ही माहिती मिळताच त्यांचे मामा रामा नवनाथ गोरे, रामा कुमटकर आणि इतर नातेवाइकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

उपस्थितांनी महेश याला झाडावरून खाली उतरवून तातडीने रुग्णवाहिके (ॲम्बुलन्स) द्वारे दुपारी १२:०५ वाजेच्या सुमारास जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून महेश यास औषधोपचारापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी मयत तरुणाचे मामा रामा नवनाथ गोरे (रा. राजेवाडी) यांनी जामखेड पोलीस ठाण्यात हजर होऊन घटनेबाबत खबर दिली आहे.

मयत महेश बिभिषण कुमटकर याचे जामखेड ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर राजेवाडी येथे महेश कुमटकर याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तरुण महेश कुमटकर याच्या आत्महत्येचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!