Home ताज्या बातम्या जामखेड पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचे निर्देश – सभापती प्रा....

जामखेड पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचे निर्देश – सभापती प्रा. राम शिंदे

जामखेड पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्प गतीने पूर्ण करण्याचे निर्देश – सभापती प्रा. राम शिंदे

पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर

जामखेड प्रतिनिधी, दि. २०

जामखेड शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पाणीपुरवठा योजना व मलनिस्सारण प्रकल्पाची कामे विहित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. या प्रकल्पातील जलशुद्धीकरण केंद्र व मलनिस्सारण प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांना या सुविधांचा लवकर लाभ मिळेल, यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

जामखेड नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेबाबत आयोजित प्रशासकीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, मुख्याधिकारी अजय साळवे, नगरसेवक प्रविण सानप, अमित चिंतामणी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

करमाळा येथून येणाऱ्या जलवाहिनीच्या उर्वरित कामाचा आढावा घेताना वनविभागाच्या परवानगीची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उर्वरित १२ किलोमीटर जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ संबंधित विभागाकडे सादर करून कामाला अपेक्षित गती द्यावी, असे निर्देश देण्यात आले.

मुख्य बाजारपेठेतील जलवाहिनीच्या कामाच्या अनुषंगाने आवश्यक समन्वयातून कामे सुरळीतपणे पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. खर्डा चौक ते बीड कॉर्नर या मुख्य मार्गावरील काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस प्रशासनाचे सहकार्य घ्यावे. योग्य समन्वयातून विकासकामे अखंडितपणे सुरू ठेवावीत, असे त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी सिमेंट रस्ते व पावसाळी गटार योजनेचा एकात्मिक आराखडा तयार करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. रस्ते व गटारींची कामे समन्वयाने पूर्ण झाल्यास शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये अधिक सुधारणा होऊन नागरिकांना दीर्घकालीन सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मलनिस्सारण प्रकल्पाच्या जलवाहिनीसाठी खोदलेल्या रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जामवाडीसह शहरातील संबंधित रस्त्यांवर आवश्यकतेनुसार मुरूम अथवा खडी टाकून वाहतूक सुरळीत ठेवावी. पावसाळ्यानंतर या रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

जलशुद्धीकरण केंद्रासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेची मोजणी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. त्यानंतर तांत्रिक आराखडा अंतिम करून आवश्यक पंपांच्या निविदा प्रक्रियेला गती द्यावी, जेणेकरून पाणीपुरवठा योजनेचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. बैठकीच्या शेवटी सर्व विभागांनी परस्पर समन्वयातून विकासकामांना गती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधीचे प्रस्ताव वेळेत सादर करावेत, जेणेकरून जामखेड शहराच्या पायाभूत सुविधांचा विकास अधिक वेगाने साधता येईल, असे प्रा. राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

चौकट

जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजना व मलनिस्सारण ड्रेनेज योजना या आधिक गतीने पूर्ण व्हाव्यात यासाठी मा.ना.प्रा.रामजी शिंदे साहेब सभापती यांच्या अध्यक्षतेखाली व पंकज आशिया जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत आज सोमवर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली. यादोन्ही योजना पूर्ण झालेनंतरच नगरपरिषद हद्दीतील रस्ते व विविध विकास कामांच्या योजनांना मंजुरी मिळणार असून नागरिकांना विकासकामांसाठी दिलेला शब्द पूर्ण करण्यास कटिबद्ध आहोत. यापुढील सर्वच विकासकामांसाठी नागरीकांनी सहकार्य करावे.

(सौ. प्रांजल चिंतामणी, प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!