Home क्राईम न्यूज लग्नात सत्काराला नाव पुकारले नाही, तलाठ्याने घातला तरुणाच्या डोक्यात लोखंडी माईक, तरुण...

लग्नात सत्काराला नाव पुकारले नाही, तलाठ्याने घातला तरुणाच्या डोक्यात लोखंडी माईक, तरुण जखमी

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील राजेवाडी येथील एका विवाह सोहळ्यात स्वागत करत असताना नाव न घेतल्याच्या रागातुन तलाठ्याने नावे पुकारत आसलेल्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी माईक घालुन गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (११ जुलै) दुपारी घडली. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात तलाठी शिवाजी सखाराम हजारे याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जवळा येथिल  फिर्यादी अशोक रामचंद्र पठाडे (वय ३७, रा. जवळा, ता. जामखेड) हे शनिवार दि ११ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता राजेवाडी येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळ्यास उपस्थित होते. फीर्यादी यांच्या गावातीलच लग्न आसल्याने ते माईकवर बोलत होते. विवाहासाठी आलेल्या नातेवाईक व गावकऱ्यांचे माईकवरून स्वागत करित होते. यावेळी लग्नाला उपस्थित असलेल्या आरोपी तलाठी शिवाजी सखाराम हजारे (रा. जवळा, ता. जामखेड) यांनी फिर्यादी पठाडे यांच्याकडे येऊन, “माझे नाव माईकवर का पुकारले नाही?” असा जाब विचारला. यानंतर आरोपीने शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या तोंडावर मारहाण केली. तसेच हातातील लोखंडी रॉड असलेला माईक हिसकावून त्यांच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले. यावेळी तु लई माजला का? “तुला खल्लास करतो” अशी धमकी दिली व नंतर हजारे हा घटनास्थळाहुन पळुन गेला.

घटनेनंतर उपस्थित असलेल्या जीवन मोहन रोडे, तानाजी लक्ष्मण पवार व प्रशांत भाऊसाहेब पवार यांनी मध्यस्थी करून फिर्यादीची सुटका केली. त्यानंतर प्रशांत मारुती शिंदे यांनी जखमी फिर्यादी यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे दाखल केले. या प्रकरणी जखमी आशोक रामचंद्र पठाडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजी सखाराम हजारोंच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ तुकाराम सोनवणे हे करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!