जामखेड शहरातील हॉस्पिटलमध्ये धक्कादायक घटना, नर्सची आत्महत्या

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये बाथरूममध्येच शबनम दस्तगीर सय्यद (वय २९) या नर्सने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही मात्र बाथरुममध्ये इंजेक्शनची सुई सापडली आहे. स्वतःच इंजेक्शन लाऊन आत्महत्या केली का इतर कोणते कारण आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की मयतचे वडील दस्तगीर सय्यद (वय ५५, रा. पोकळे वस्ती, जामखेड) यांनी दिलेल्या खबरीवरून जामखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दस्तगीर सय्यद यांच्या खबरीनुसार, त्यांची मुलगी शबनम दस्तगीर सय्यद ही जामखेड शहरातील बस स्थानक परिसरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करीत होती.

गुरुवारी (दि. २३) सकाळी १० वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. सकाळी साडेदहा वाजता ती हॉस्पीटलमधील बाथरूममध्ये गेली, मात्र बराच वेळ ती बाहेर आली नाही. त्यामुळे हॉस्पिटल मधिल कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून पाहिले असता, ती बेशुद्धावस्थेत बाथरूम मध्ये आढळून आली. डॉक्टरांनी पाहीले असता ती मृत झाल्याचे दिसून आले. नंतर तिला जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी २.३० वाजता डॉक्टरांनी शबनम हिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नर्स शबनम दस्तगीर ही विवाहित असून, तिला पाच व सहा वर्षांची दोन मुले आहेत. घटस्फोट झाल्याने गेल्या काही वर्षांपासून ती माहेरी वडिलांकडे जामखेड येथे राहत होती. जामखेड शहरातील एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणू कार्यरत होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही तरी पुढील तपास जामखेड पोलिस करत आहेत.

चौकट

मयताच्या हातावर इंजेक्शनची टोचलेली सुई ची खुन दिसुन आली आहे. नेमके शरीरात कोणते औषध घेऊन आत्महत्या केली आहे का? यासाठी डॉक्टरांनी मयताचा व्हीसेरा कढुन ठेवला आहे. पोलीस हा व्हीसेरा तपासणीसाठी नाशिक येथे पाठवणार आहेत त्यानंतरच आत्महत्याचे खरे कारण समजु शकणार आहे आशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंडलिक अवसरे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here