


लहान मुलांच्या भांडणातून पती-पत्नीकडून महिलेला काठीने मारहाण, गुन्हा दाखल
जामखेड शहर : पुढारी वृत्तसेवा
तुमच्या मुलीने आमच्या मुलाचा बॉल चोरला या कारणावरुन पती-पत्नीने सदर मुलीच्या आईस लाथाबुक्क्यांनी व काठीने जबर मारहाण करून जखमी केले आहे. यावेळी झालेल्या झटापटीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले अशी तक्रार सदर महिलेने पती-पत्नी विरोधात दाखल केल्याने पोलिसांनी भारतीय न्यासहाता 2023 च कलम 118(1), 324(4), 115(2), 352.351(2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संध्या दिपक निमोणकर (वय-३० वर्ष, रा. बेल्हेकरगल्ली जामखेड) यांनी फिर्याद दिली की, बुधवार दि. २२ रोजी सायंकाळी साडेआठ वाजता माझी मुलगी रिध्दी बेलेकर गल्लीतील राहत्या घरासमोर खेळत असताना आरोपी विनोद विटकर व त्याची पत्नी नाव माहीती नाही (दोघे बेल्हेकर गल्ली, जामखेड) दोघे आले व तुमची मुलगी रिध्दी हीने आमचे मुलाचा बॉल चोरला आहे तो आम्हाला दया असे म्हणुन त्यांनी फिर्यादी व त्यांची आई यांना शिवीगाळ, दमदाटी करुन लाथाबुक्याने व लाकडी काठीने मारहान करुन जखमी केले व तुम्हाला जिवंत सोडणार नाहीत अशी धमकी दिली आहे. सदरचे झटापटीत माझे गळयातील मंगळसूत्र पडुन गहाळ झाले आहे. अशी फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी आरोपी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी कदम करत आहेत.





