Home क्राईम न्यूज अपघातात जखमी झालेल्या वहान चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

अपघातात जखमी झालेल्या वहान चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

 

अपघातात जखमी झालेल्या वहान चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

जामखेड प्रतिनिधी

आकलुज येथे विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना जामखेड जवळ झालेल्या अपघातातील वहान चालक आशोक बाळासाहेब कोल्हे याचा अहिल्यानगर येथिल हॉस्पिटलमध्ये दोन दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आपघातात चारचाकी वाहन पलटी होऊन वहान चालकासह एकुण आठ जण जखमी झाले होते. उर्वरित सात विद्यार्थी हे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

अधिक माहिती अशी की रविवार दि ३० मार्च २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजता चारचाकी गाडीचा चालक आशोक बाळासाहेब कोल्हे रा. चिंचपूर, ता. आष्टी, जिल्हा बीड. हा गाडीचे भाडे घेऊन जामखेड येथील काही विद्यार्थी अकलुज येथे वॉटरपार्कला चालला होता. त्यांचे चारचाकी वाहन हे शहरापासून तीन कीमी अंतरावरील जामखेड कर्जत रोडवरील रत्नदीप मेडीकल कॉलेज जवळ आले असताना अचानक या वहानाने दोन ते पल्टी मारल्या. या चारचाकी वाहनाच्या झालेल्या अपघातात चालकासह एकुण आठ जण जखमी झाले होते. यातील श्रेयस प्रल्हाद राजगुरू रा. जामखेड व गाडीचा चालक आशोक बाळासाहेब कोल्हे रा. चिंचपूर, ता. आष्टी जिल्हा. बीड हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर या ठिकाणी हलवण्यात आले होते. तर उर्वरित जखमींवर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मयत आशोक बाळु कोल्हे याच्या छातीला मार जास्त लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. अखेर दोन दिवसानंतर बुधवार दि १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता अहिल्यानगर येथिल हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान चालक कोल्हे याचा मृत्यू झाला. अशोक कोल्हे याच्यावर त्याच्या चिंचपूर गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे पत्नी व दोन लहान मुले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!