

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या मोजणीस सुरूवात
जामखेड शहर प्रतिनिधी
जामखेड शहरातुन जाणार्या ५४८ डी या राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे नागरिकांना वहातुचा सामना करावा लागत आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे अतिक्रमण काढून रस्ता पुर्ण व्हावा अशी मागणी जोर धरु लागली आहे. याच आनुशंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार धनंजय बांगर यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत १ एप्रिल पासून हद्द निश्चिती कामास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जामखेड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला आहे. यामुळे नागरिकांना धुळ, खाचखळगे व वाहतूक कोंडीचा समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी उपोषण केले होते. यावेळी हद्द निश्चिती करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. यानंतर २०२३ मध्ये भूमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्ग, नगरपरिषद, तहसील विभाग यांच्या वतीने मोजमाप करून हद्दखुणा निश्चित केल्या होत्या, पण त्या अतिक्रमण धारकांनामान्य नसल्यामुळे त्या पुसल्या होत्या. सध्या राष्ट्रीय महामार्ग बाबत वाद न्यायालयात गेला आहे. सध्यातरी हा रस्ता रखडलेला आहे. यामुळे पुन्हा हद्द निश्चिती कामास सुरुवात झाली आहे. प्रकरण न्यायालयीन असल्यामुळे या खुणा कोणी पुसल्यास संबंधितावर कायदेशीर दंडात्मक कार्यवाही होईल असे तहसीलदार धनंजय बांगर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अतिक्रमण धारकांना नोटीस देऊन लवकरात लवकर अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. महसूल विभाग, भुमी अभिलेख, राष्ट्रीय महामार्ग, नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हद्द निश्चिती करण्याचे काम सुरू झाले आहे. बुधवार दि. १ रोजी दुपारी शहरातील ५४८ डी या राष्ट्रीय महामार्गचे पोलीस संरक्षणात राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, भूमी अभिलेख, तहसील विभाग, नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मोजणीस सुरूवात झाली आहे. आता लवकरात लवकर रस्ता पुर्ण व्हावा अशी मागणी होत आहे.

यावेळी नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी दशरथ कासार, भुमीअभिलेखचे अधिकारी गिरीश अवारे व प्रविण भोकनळ यांच्या विभागाने आज मोजणीस सुरूवात केली आहे.









