ट्रकचालकास मारहाण करून लुटमार प्रकरणी तीन आरोपी जेरबंद

जामखेड पोलीसांनी १२ तासास आरोपींना केली अटक

जामखेड प्रतिनिधी

पुणे येथुन कोंबडीचे खत घेऊन माजलगावकडे जात असताना जामखेड साकत रोडवर सावरगाव जवळ ट्रक चालकास मोटारसायकल वरुन आलेल्या तीन जणांनी ट्रकला मोटारसायकल आडवी लावली. यानंतर ट्रकच्या काचा फोडून व ट्रकचालकास महारण करुन लुटमार केली. या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अवघ्या बारा तासातच अटक केली आहे.

या प्रकरणी शुभम सुर्यभान चव्हाण, शुभम ज्ञानोबा चव्हाण व राम अशोक अडाले व एक अल्पवयीन मुलगा सर्व राहणार सावरगाव ता. जामखेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि ३० मार्च रोजी फीर्यादी संतोष बिभीषण फरताडे, ड्रायव्हर रा. सोमनाथ वाडी ता. जिल्हा बीड व बाळु शामराव तांबे रा. परांडा जिल्हा धाराशिव हे दोघे ट्रक क्रमांक एम एच १४ एल एक्स ९९६९ या मधुन पुणे येथुन माजलगाव या ठिकाणी कोंबडीचे खत घेऊन चालले होते. दि ३१ मार्च रोजी रात्री त्यांचा ट्रक हा जामखेड साकत रोडवर पाच कीमी अंतरावर आला. यावेळी त्या ठिकाणी स्पिड ब्रेकर होते त्यामुळे ट्रक चालकाने गाडीचा वेग कमी केला. त्यानंतर तीन आरोपींनी ट्रकला मोटारसायकल आडवी लावली व ट्रकच्या काचा फोडल्या तसेच ट्रक मधिल दोघांना मारहाण करण्यास करुन चाकुचा धाक दाखवून बळजबरीने खिशातील रोख रक्कम व गाडीतील साहीत्य काढुन घेतले व फरार झाले.

यानंतरची घटना जामखेड पोलीसांना समजताच पोलीस पथकातील पो. ना. रविंद्र वाघ, पो. कॉ. देविदास पळसे, कुलदिप घोळवे व आकाश शेवाळे यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी व परिसरात रवाना झाले. तपास करित असताना पोलिसांना सदरचे आरोपी सावरगाव येथील असल्याचे समजले. आरोपी शुभम सुर्यभान चव्हाण व राम अशोक अडाले यांना पोलिसांनी जामखेड तालुक्यातील सोनेगाव परीसरातुन ताब्यात घेतले तर तर शुभम ज्ञानोबा चव्हाण यास सावरगाव डोंगर भागातुन ताब्यात घेतले. विशेष म्हणजे जामखेड पोलीसांना अवघ्या १२ तासास आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अहिल्यानगर, व उप विभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे, कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोसई किशोर गावडे, पोसई पुष्कर कडू, पो. ना. रविंद्र वाघ, पो.कॉ. देविदास पळसे, कुलदिप घोळवे, आकाश शेवाळे, ज्ञानेश्वर बेल्हेकर, भागीरथ देशमाने, दत्तु बेलेकर, इश्वर माने, होमगार्ड भारत चव्हाण, संदिप चव्हाण, गणेश गायकवाड, दिंगाबर औचारे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ. नितीन शिंदे व राहुल गुंडू यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here