

जामखेड तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी; विश्वशांतीसाठी केली प्रार्थना
ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरासह तालुक्यातील खर्डा, अरणगाव, जवळा, नान्नज, धनेगाव आणि पिंपरखेड येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली. विविध ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामुहिक नमाज अदा केली आणि सर्वांसाठी सुख-शांतीची प्रार्थना केली. शनिवार सकाळी नऊ वाजता झालेल्या मुख्य नमाज पठणाला हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. सर्व मुस्लीम बांधवांना मौलाना मुफ्ती अब्दुल आ लीम पठाण यांनी नमाजाचे पठन केले. या पवित्र प्रसंगी त्यांनी विश्वशांती, बंधुता आणि माणुसकीसाठी प्रार्थना केली.

समाजात संवाद वाढावा, प्रेम आणि सेवाभाव बळकट व्हावा, यासाठी मौलाना मुक्ती अब्दुल आलीम पठाण यांनी नमाज अदा करून अल्लाहकडे प्रार्थना केली. नमाज पठणानंतर ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष अझरभाई काझी, उपनगरध्यक्ष पोपट राळेभात, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, प्रा. संजय वराट, मोहन पवार, प्राचार्य विकी घायतडक, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष प्रा. कैलास माने, शिवसेना नेते आकाश बाफना, सामाजिक कार्यकर्ते अवधुत पवार, प्रा. लक्ष्मण ढेपे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अरुण जाधव, भाजप शहराध्यक्ष पवन राळेभात , काँग्रेसचे राहुल उगले, सुरेश जाधव, शिवकुमार डोंगरे, अमोल गिरमे, वसीम सय्यद, संदीप गायकवाड, राजू गोरे ,शहाजी राळेभात, प्रशांत राळेभात, प्रदीप टापरे, शेरखान पठाण, शमा हाजी कादर, एजाज पठाण, वाजीद पठाण, वैजनाथ पोले, प्रा. कैलास हजारे, सुनील जावळे, हरीभाऊ आजबे, शिवकुमार डोंगरे, गफ्फारभाई सय्यद, मंजुरभाई सय्यद, हाबीब मास्टर, उमर कुरेशी, हाजी जावेद सय्यद, वसीम कुरेशी, मुक्तार सय्यद, जमीर सय्यद, ईस्माइल सय्यद, काँग्रेसचे राहुल उगले, वसीम सय्यद, आबेद खान, जुबेर भाई शेख आदी उपस्थित होते.

रमजान महिना संयम, भक्ती आणि परोपकाराचा संदेश देणारा मानला जातो. यानिमित्ताने मुफ्ती अब्दुल आलीम पठाण यांनी जगातील शांततेसाठी आणि भारतातील सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी विशेष प्रार्थना केली. त्यांनी सर्वधर्मीयांनी परस्पर सहकार्य आणि सामंजस्याने पुढे जाण्याचे आवाहन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. सामाजिक, राजकीय, पत्रकार आणि प्रशासनिक क्षेत्रातील व सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मुस्लिम समाज बांधवांना अलिंगन देऊन ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ईदगाह मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवले. खर्डा चौक, जयहिंद चौक, मशिदी व दर्गाहमध्ये अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मुस्लीम पंच कमिटीचे अध्यक्ष अझहर काझी यांनी सर्व पक्षीय कार्यकर्ते इदगाह मैदानावर येऊन मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देतात . व राष्ट्रीय सलोखा राखतात त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

चौकट
अजहर काझी यांच्याकडून शीरखुर्मा पार्टी
अझहर काझी यांच्या शीरखुर्मा पार्टीत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रशासकीय, व्यापारी, कृषी, पत्रकार मंडळी हजर होते. यानिमित्ताने सर्व जाती-धर्मांमध्ये जातीय सलोखा रहावा. सर्व जण सुख शांतीने नांदावेत अशा प्रकारची प्रार्थना करण्यात आली. शीरखुर्मा पार्टीत गुलगुले, भज्याचा सर्वांनी मनमुरादपणे आस्वाद घेतला.




