सारोळा जिल्हा परिषद शाळेत तब्बल 20 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची गुढी

जामखेड (प्रतिनिधी)

शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा या ठिकाणी गुढी पाडवा,पट वाढवा या उपक्रम अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026- 27 मध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्याचा नवागतांचे स्वागत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी पुढील वर्षाकरिता एकूण 20 विद्यार्थ्यांना प्रवेश फॉर्म भरून पहिलाच्या वर्गात दाखल करण्यात आले.सदर चिमुकल्या विद्यार्थ्यांना फेटा बांधत तसेच ड्रॉइंग बुक, क्रेयॉन कलर बॉक्स,फनी कॅप व खाऊ देऊन त्यांचे प्रशालेच्या वतीने स्वागत करण्यात आले.तसेच या विद्यार्थ्याचे माता व पालक यांच्या प्रती मनस्वी आभार व्यक्त करण्यात आले.

तसेच सारोळा प्रशालेतील भाषा विषयाचे पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक माजीद शेख सर यांची राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा प्रशालेच्या वतीने सन्मान करण्यात आला.सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेने पहिलीत नवीन प्रवेश घेतलेल्या 20 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अनोखी गुडी उभारून मराठी माध्यमाच्या सरकारी शाळांची गुणवत्ता ठळकपणे समाजासमोर आणली आहे असे मत नूतन केंद्रप्रमुख शेख साहेब यांनी आपल्या मनोगत मधून व्यक्त केले.तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांचा देखील प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम प्रसंगी राजुरी केंद्राचे केंद्रप्रमुख माजीद शेख ,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे,माजी उपाध्यक्ष देविदास पवार,अंगद चव्हाण व देवा कुलकर्णी, अंगणवाडी सेविका काळे ताई, अनुसया सहदेव काळे, रेश्मा धनंजय मुळे,पदवीधर शिक्षक राहुल लिमकर, उपाध्यापक प्रशांत होळकर, उपाध्यापिका शबाना शेख,अमृता रसाळ मॅडम उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here