

जामखेड तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड हर्षल डोके यांची निवड
जामखेड तालुका वकील संघ निवडणुकीचा निकाल जाहीर
जामखेड प्रतिनिधी
जामखेड वकील संघाच्या सन २०२६-२७ या वर्षासाठी पार पडलेल्या निवडणुकीत ॲड. हर्षल एन.डोके यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. याच बरोबर उपाध्यक्ष म्हणुन ॲड. घनश्याम एम.राळेभात यांची बहुमताने निवड झाली. तसेच सचिव पदी ॲड. शिवाजी लटपटे व खजिनदार पदी ॲड. सागर मोरे, यांनी देखील बाजी मारलेली आहे. तसेच ग्रंथपाल पदी ॲड. एच.डी. सपकाळ व महिला सचिव पदी ॲड वैष्णवी गोलेकर मॅडम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

जामखेड वकील संघाची सन २०२५-२६ या वर्षासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, महिला सचिव, खजिनदार व ग्रंथपाल या पदाकरीता दि २६ फेब्रुवारी २०२६ रोजी नुकनिवडणुक पार पडली. वरील पदासाठी मतदान घेण्यात येवुन अध्यक्षपदी ॲड.हर्शल एन.डोके व उपाध्यक्षपदी ॲड.घनश्याम एम. राळेभात, सचिव पदासाठी ॲड.शिवाजी लटपटे, खजिनदार पदासाठी ॲड. सागर मोरे हे विजयी झाले. तर ग्रंथपाल पदी ॲड. एच.डी.सपकाळ व महिला सचिव पदा साठी ॲड. वैष्णवी गोलेकर मॅडम यांची बिनविरोध निवड झाली.

ॲड.हर्शल डोके या पुर्वीही दोन वेळा जामखेड वकील संघाचे निवडणुकीत निवडुण येवुन अध्यक्ष म्हणुन काम पाहिलेले आहे व त्यांनी त्यांचे कार्यकाळात जामखेड न्यायालयाचे नविन ईमारतीचे कामासाठी सर्व वकीलांना बरोबर घेवुन मोठे योगदान दिलेले आहे. तसेच जामखेड येथे वकील संघाचे वतीने मोठ मोठे कार्यक्रम घेतलेले आहेत. त्यासाठी मा.ना.उच्च न्यायालयाचे न्यायाधिश यांना देखील आमंत्रित केलेले होते. त्यामुळे त्यांना सर्व जेष्ठ व कनिष्ठ वकीलांना बरोबर घेवुन काम करण्याचा अनुभव आहे. येथुन पुढे जेष्ठ वकीलांचे मार्गदर्शनाखाली व तरूण वकीलांच्या साथीने काम करणार असल्याचे देखील नवनिर्वाचित जामखेड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. हर्षल डोके यांनी सांगितले.

निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे ॲड.कोल्हे, ॲड.एस.आर.झरकर,ॲड.शेख ए.के, ॲड.एन.एल.बोरा, ॲड.प्रमोद राऊत, ॲड.संगाम पोले, नगरसवेक सभापती ॲड.प्रविण सानप, ॲड.गणेश पाटील, ॲड.चंद्रकांत ढाळे, ॲड.एन.के.घुमरे, ॲड.वराट, ॲड.दिलीप वारे, ॲड.टी.एस.पवार, ॲड.सुभाश जायभाय, ॲड.पोपट कात्रजकर, नगरसेवक, ॲड.अरूण जाधव, ॲड. काशिद, ॲड.कोरे, ॲड.गोले, ॲड.पारे, ॲड.अनिल काळे, ॲड.वाळुंजकर, ॲड.थोरात, ॲड.अनिल बारवकर, ॲड.एम.एन.नागरगोजे, ॲड.कारंडे, इतर सर्व वकील बांधवांनी अभिनंदन केले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ॲड. पाटील व्हि.वाय यांनी काम पाहिले त्यांना सहाय्यक म्हणुन ॲड. नितीन घुमरे यांनी काम पाहिले.








