

जनतेच्या अडचणी व प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करा- प्रदेशध्यक्ष महेबुब शेख
राष्ट्रवादी युवक काँग्रेस (श. प.) चे प्रदेशध्यक्ष महेबुब शेख यांनी केले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
जामखेड प्रतिनिधी
शहरातील प्रलंबित विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी व आवश्यक प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करा. प्रत्येक प्रभागात संघटन मजबूत करा. असे मार्गदर्शन करतानाच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष महेबुब शेख यांनी युवकांना पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस (श. प.) चे प्रदेशध्यक्ष महेबुब शेख यांनी आज दि. ३१ जानेवारी रोजी जामखेड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शहाजी (काका) राळेभात यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी जेष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष वैजिनाथ पोले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, अवधूत पवार, नगरसेवक राजेंद्र गोरे, वसिम सय्यद, माजी नगरसेवक बिभिषण धनवडे, फिरोज कुरेशी, प्रवक्ते डॉ.कैलास हजारे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय डोके, कुंडल राळेभात, पाडळीचे सरपंच बाळासाहेब खैरे, बजरंग डूचे, अशोक घुमरे, साहिल बागवान, संजय डोके, सागर जगताप, अजित अडाले, बाळासाहेब कांबळे, सचिन शिंदे, अनिल रेडे, वसिम शेख, दादा महाडिक, दिपक घायतडक, दत्तात्रय डिसले, विकास अडाले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला. तसेच संघटनात्मक आढावा घेत तालुक्यातील राजकीय व सामाजिक घडामोडी तसेच जामखेड नगर परिषदेसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा केली. तसेच नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय परिस्थितीचा आढावा घेत पुढील रणनीती, संघटन विस्तार व कार्यकर्त्यांची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात केले.






