

ल. ना. होशिंग विद्यालयातील माजी विद्यार्थींचा तब्बल ४७ वर्षांनी भरला मेळावा
जामखेड प्रतिनिधी
ल. ना होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने तब्बल ४७ वर्षांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी काही सुखावणारे तर काही भावूक करणारे क्षण यानिमित्ताने पाहायला मिळाले. ल.ना. होशिंग विद्यालयाच्या १९७८ नंतर हे माजी विद्यार्थी प्रथमच तब्बल ४७ वर्षानंतर एकत्र आले होते. या स्नेहमेळाव्यास एकुण २५ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष घेवरचंद धोका म्हणाले मी कुर्डूवाडी येथे शेतकरी कुटुंबातील आहे. माझे दोन मुले डॉक्टर आहे मी स्वतः डॉक्टर आहे. माझा सराफी व्यवसाय आहे. सुशिक्षित फॅमिली असल्यामुळे शेती करण्याची पहिल्यापासून आवड होती सध्या चांगल्या प्रकारचे फार्म हाऊस तयार केले आहे. मला या कार्यक्रमात येण्याचा योग माझी पत्नी मंगल सुराणा/धोका हीच्यामुळे आला आसुन मला खूप आनंद वाटला पुढील वर्षाचं स्नेहसंमेलन कुर्डूवाडी येथे माझ्या फार्मवर करावा अशी ही विनंती धोका यांनी केली.

शालेय मित्रांनी एकत्रपणे भेटावे या संकल्पनेतून माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, चंद्रशेखर कुलकर्णी, रवींद्र कुलकर्णी, कासम शेख, मंगल पवार, आशा देशमुख आदींनी स्नेहमेळावा घेण्यासाठी पुढाकार घेतला. या स्नेहमेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन करून २५ आजी, आजोबा झालेल्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणले. यावेळी आमचे शिक्षक स्वर्गीय जी. एल. देशमुख सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
सदरील स्नेहमेळाव्यास अनुक्रमे संजय कोठारी, चंद्रशेखर कुलकर्णी, डाॅ. सुनिल कटारीया, रवींद्र कुलकर्णी, डाॅ.कासम शेख, प्रकाश पितळे, दिलीप भंडारी, प्रमोद चोरडीया, बबन खराडे, वसंत ताहाराबादकर, बाळू कासार व महिलांमध्ये मंगल पवार, मंगल काथवटे, मंगल सुराणा, सुरेखा कोठारी, छाया बोरा, निर्मला पितळे, रेखा गुंदेचा, आशा देशमुख, जया महामुनी, रोहिणी देशमुख, किरण कटारीया, विणा कुलकर्णी, रेखा व्यवहारे आधी उपस्थित होते.

यावेळी सर्वानुमते असे ठरले की वयाच्या साठ वर्षा पुढे पदार्पण करत असल्याने, तुम्ही स्वतःसाठी जगा, मुलांमुलींच्या, सुनांच्या मध्ये मध्ये करू नका. चांगलं जगायचं असेल तर स्वतःसाठी जगा तब्येतीची काळजी घ्या असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमावेळी जुन्या रितीरिवाजांना उजाळा देत बोर नान्ह, ढवळे जेवण अशा कार्यक्रमाने कार्यक्रमात रंगत झाली. यावेळी जुन्या गाण्याच्या भेंड्या, बॉल फेक असे अनेक उपक्रम केले. सदरील कार्यक्रम हा अहिल्यानगर येथील निसर्ग हुरडा पार्टी येथे घेण्यात आला होता. यावेळी सर्व मित्र मैत्रिणींना भेटून खूप आनंद झाला. यावेळी बोलताना बबन खराडे म्हणाले आम्हाला या वयात कुठे जायला मिळत नाही परंतु या स्नेहसंमेलनामुळे खूप चांगले वाटते मी भावुक झालो असल्याची भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमावेळी सर्वांनी आपला परिचय आणि आपली संपूर्ण माहिती आपण काय करतो मुले काय करतात अशी माहिती दिली. स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, चंद्रशेखर कुलकर्णी, मंगल पवार, आशा देशमुख, कासम शेख यांनी परिश्रम घेतले.




