भाजपा शिक्षक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. संजय राऊत यांची निवड

जामखेड प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी शिक्षक सेल अहिल्यानगर दक्षिण यांची नुकतीच कार्यकारणी जाहीर झाली आहे. यामध्ये जामखेड येथील प्राध्यापक संजय राऊत यांची भाजपच्या शिक्षक सेल जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सूचनेनुसार व भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या आदेशानुसार ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणी मध्ये दादासाहेब शेळके पाथर्डी उपाध्यक्ष,
बाळासाहेब दुधाळ पारनेर, उपाध्यक्ष, धर्मराज सुरवसे शेवगाव, सरचिटणीस, प्राजक्ता दरेकर, श्रीगोंदा सरचिटणीस,
रवींद्र साळुंखे कर्जत चिटणीस, नितीन राऊत जामखेड चिटणीस, यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच विशेष निमंत्रण मध्ये प्राध्यापक नामदार रामजी शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विक्रम पाचपुते, अक्षय कर्डिले, भानदास बेरड, दिलीप भालसिंग, विश्वनाथ कोरडे, चंद्रशेखर खरमोरे, मधुकर राळेभात, भगवान मुरूमकर, अजय काशीद, अमित भाऊ चिंतामणी, मनोज कुलकर्णी, सोमनाथ पाचरणे, रवी सुरवसे, सचिन पोटरे, दादा सोनमाळी, गणेश पालवे, पांडुरंग उबाळे यांची उपस्थितीत असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here