
अखेर जामखेड ग्रामिण रुग्णालयाच्या दोन कर्मचाऱ्यांची केली उचलबांगडी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ने देखिल उठवला होता आवाज..
जामखेड प्रतिनिधी
जामखेड ग्रामिण रुग्णालयातील मुजोर कंत्राटी कर्मचारी आणि काही अधिपरिचारिकांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे वैतागून जामखेड ग्रामिण रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मोरळे यांनी आपली बदली करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस होता. या प्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठविला होता. अखेर याची दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दोन आरोग्य कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे.

जामखेड ग्रामीण रुग्णालयातील प्रशासकीय शिस्त आणि रुग्णसेवा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कथित मनमानीमुळे धोक्यात आली होती. मुजोर कंत्राटी कर्मचारी आणि काही अधिपरिचारिकांच्या सततच्या हस्तक्षेपामुळे वैतागून कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मोरळे यांनी आपली बदली करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस होता. विषेश म्हणजे एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे आपली बदली करून घ्यावी लागते यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली होती. यावेळी निवेदना दरम्यान वैद्यकीय जिल्हा आरोग्य अधिकारी शिवशंकर वंलाडे यांनी दोन दिवसांत कार्यवाही करतो असे आश्वासन देखील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांना दिला होता. याबाबत अनेक वृत्तपत्रात बातम्या देखील छापुन आल्या होत्या. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने देखील भेट देऊन वरीष्ठ पातळीवर अहवाल सादर करुन पाठवला होता. याबाबत जामखेड चे सामाजिक कार्यकर्ते रमेश दादा आजबे यांनी देखील वेळोवेळी आवाज उठवला होता. तसेच दोषी कर्मचाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर जामखेड बंदचा इशारा देखील जामखेडच्या ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला होता. अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अहिल्यानगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दोन आरोग्य कर्मचाऱ्यांची उचलबांगडी केली आहे.

जामखेड ग्रामिण रुग्णालयाच्या कारभार प्रकरणी एक चौकशी समीती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने मंगळवार दि ३० डिसेंबर २०२५ रोजी जामखेड ग्रामिण रुग्णालयास भेट देऊन चौकशी केली व याबाबतचा अहवाल वरीष्ठ पातळीवर पाठवण्यात आला होता. अखेर याची दखल घेऊन अहिल्यानगर चे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी चौकशी समीतीच्या प्राप्त अहवालानुसार गुरवार दि १ जानेवारी २०२६ रोजी लेखी पत्र काढुन जामखेड ग्रामिण रुग्णालयातील अधिपरिचारिका सारीका एकनाथ माळी यांची तात्पुरत्या स्वरूपात चिचोंडी पाटील, ग्रामिण रुग्णालय या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञान शाम जाधवर यांची श्रीगोंदा ग्रामिण रुग्णालय या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. या दोघांची एकावेळी बदली झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.




