
जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी राज्यस्तरीय ‘मानव सेवा’ पुरस्काराने सन्मानित
जामखेड प्रतिनिधी
जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन, नाशिक व श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली (महाराष्ट्र प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा देशपातळीवरील ‘मानव सेवा’ पुरस्कार जामखेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना देण्यात आला आहे.

दि ३१डिसेंबर रोजी जैन सांस्कृतिक कला महोत्सव नाशिक तसेच जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोनचे महाराष्ट्र प्रांतीय अध्यक्ष मोहनलाल लोढा व कांतीलाल चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था गेल्या २१ वर्षांपासून सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. पुरस्कार निवड समितीने संजय कोठारी यांच्या मानव सेवेतील भरीव योगदानाची दखल घेत त्यांची या राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला पुरस्काराचे स्वरूप मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे होते. नाशिक जिल्हा जैन सांस्कृतिक कला फाउंडेशन गेल्या २१ वर्षांपासून जैन समाजातील युवक-युवती व बालकांसाठी धार्मिक व वैचारिक चर्चासत्रांचे आयोजन करीत आहे. दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी अनावश्यक खर्च टाळून साधु-संतांच्या विचारांवर आधारित कार्यक्रम घेतले जातात. मध्यरात्री १२:०५ वाजता २०२६ नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परमपूज्य स्वर सम्राज्ञी मधुस्मिताजी महासतीजी यांच्या मांगलिकांने कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात भरत नागदा जैन. राजस्थान यांना करुणा रत्न पुरस्कार, नंदकुमार भटेवरा कोल्हार यांना समाज भूषण पुरस्कार संजय कोठारी जामखेड यांना मानव सेवा पुरस्कार मिठालाल कांकरिया छत्रपती संभाजीनगर यांना जीवन गौरव पुरस्कार मधुसूदन गांधी डोंबिवली यांना समाज रत्न पुरस्कार महेंद्रजी बोरा वणी यांना शिक्षा सहकार सेवा पुरस्कार डॉक्टर सुप्रिया गुगळे यांना महिला आरोग्य सेवा पुरस्कार असे एकूण सात पुरस्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे उद्योगपती आशिष भंन्साळी होते. यावेळी बोलताना सी.ए. हेमराज खाबिया म्हणाले संजय कोठारी जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी व नव्या पिढीला प्रेरणादायी असे कार्य केले आहे. अपघातग्रस्त हजारो जखमींचे प्राण वाचविणे, अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तत्काळ मदत, कोरोना काळात केलेली मोलाची सेवा ही त्यांच्या कार्याची ठळक उदाहरणे आहेत. तसेच जैन साधु-संतांच्या विहार व उपचारासाठी मदत, दर्शनासाठी मोफत संघ सेवा, हजारो झाडांचे वृक्षारोपण, कडक उन्हाळ्यात पाणीवाटप, ५०३ लोकांचे देहदान फॉर्म भरून घेतले असून व नेत्रदान जनजागृती, अहिल्यानगर येथील विखे पाटील फाउंडेशनमध्ये २६ जणांचे देहदान यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.याशिवाय मुक्या प्राण्यांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था, रस्त्यावर सापडलेल्या जखमी पशु पक्षी मोर, हरीण, सायाळ, काळवीट आशा जखमी प्राण्यांचे वन अधिकाऱ्यांच्या समवेत अंत्यसंस्कार केले, बेवारस मृतदेहांचे अंतिम संस्कार, बेवारस व्यक्तींना रुग्णालयात उपचार व स्नेहालय संस्थेमार्फत पुनर्वसन, एड्सग्रस्त रुग्णांना मदत, तसेच नवजात बालिका व अर्भकांचे प्राण वाचवून त्यांना इटली, मुंबई आदी ठिकाणी दत्तक देण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे.

या सर्व मानवतावादी कार्याची दखल घेत ३१ डिसेंबर २०२५ रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार संजय कोठारी यांना समाजातील दानशूर व्यक्तींच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. आतापर्यंत त्यांच्या सामाजिक कार्यासाठी त्यांना ८० पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी जामखेड येथील मिठूलाल नवलाखा, कोल्हार येथील नंदकुमार भटेवरा, कांतीलाल चोपडा, सीए हेमराज खाबीया आदींची भाषणे झाली.
या कार्यक्रमावर मिठूलाल नवलाखा, संतोष रानडे, रोहिदास केकाण, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सीए लोकेश पारख यांनी केले तर मनोरंजन तर तरुण मोदी पुणे यांनी केले शेवटी बारा वाजून पाच मिनिटांनी परमपूज्य स्वर सम्राज्ञी मधुस्मिताजी महासतीजी यांनी २०२५ कोणत्या वर्षाचे आभार मानून व्हिडिओ कॉल द्वारे नवीन २०२६ वर्षाच्या शुभेच्छा देऊन महामांगली दिली.








