


काटकर वस्ती येथील सावळेश्वर कॉलनीत आकाश बाफना यांच्या वतीने मुरुमीकरण सुरू
जामखेड प्रतिनिधी
नगरपरीषदेला अर्ज देऊन देखील दखल न घेतलेल्या काटकर वस्ती येथील सावळेश्वर कॉलनीत पावसामुळे हे रस्ते चिखलमय व त्यावर खड्डे पडले होते. नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. अखेर सर्वांच्या मदतीला धावून जाणारे आदर्श फाउंडेशन चे अध्यक्ष व युवा नेते आकाश बाफना यांनी त्या भागातील रस्त्यांनवर मुरुमीकरणाचे काम सुरू केले.

याच पार्श्वभूमीवर आदर्श फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी आज स्वतः घटनास्थळी भेट देऊन नागरिकांच्या मागणीवर मुरुमीकरणाचे काम सुरू केले. या यामुळे परिसरातील नागरिकांचा मार्ग सुकर झाला आहे. यावेळी बोलताना बाफना म्हणाले की, कोणालाही कुठेही मदतीची गरज भासल्यास किंवा नागरिकांच्या समस्या उद्भवल्यास त्वरीत आदर्श फाऊंडेशनशी संपर्क साधावा असे मी आवाहन करतो. नागरिकांचे सहकार्य व कौतुक आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देते. यावेळी नागरिकांनी आकाश बाफना यांच्या कार्याची प्रशंसा करत, मानाचा फेटा बांधून, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.

चौकट
—————
प्रत्यक्ष भेटीगाठीने काम करणारा युवा नेता
शहरासह नगरपरिषदेच्या हद्दीत सात वाड्या-वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्वरित उपाय करणारा बाफना परिवारातील तडफदार युवा आकाश बाफना सध्या लोकांच्या जवळचा नेता म्हणून चर्चेचा विषय ठरला आहे.सामाजिक वारसा लाभलेला हा परिवार विविध सामाजिक कार्यांमधून प्रसिद्ध असून, लोकांच्या पसंतीस उतरणारा उपक्रम शहरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

लोकपसंतीस उतरणारा…युवा नेता प्रत्यक्ष कामावर
शहरासह नगरपरिषदेच्या हद्दीत सात वाड्या-वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्वरीत उपाय करणारा बाफना परिवारातील तडफदार युवा आकाश बाफना नागरिकांच्या पसंतीस उतरलेला नेता ठरला आहे. सामाजिक वारसा लाभलेल्या या परिवाराने अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. लोकांच्या समस्या समजून त्वरित सोडविण्याची तत्परता आणि कार्यक्षमता लोकमतात लोकांच्या हृदयस्पर्शी ठरत आहे.







