बांधखडकचे भाजपा युवा नेते व उद्योजक केशव आण्णा वणवे यांनी दुरुस्ती केले स्वखर्चातून दोन रस्ते

जामखेड प्रतिनिधी

सामाजिक कार्यात नेहमीच तत्पर सेवा करणारे व भाजपा युवा नेते व उद्योजक बांधखडक येथील केशव (अण्णा) वनवे यांनी बांधखडक पूलाची व दरडवाडी पुलाजवळ पडलेले भगदाड मशनिरी लावुन स्वखर्चातून दुरुस्तीचे काम करुन दिले. त्यामुळे दोन्ही रस्ते सुरु झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून जामखेड तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जामखेड-खर्डा रोडवरील दरडवाडी येथिल पुलाजवळ मोठे भगदाड पडले आहे. सध्या पुलाचे काही कठाडे देखील तुटले आहेत. त्यामुळे सध्या हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पुलाजवळ रस्ता खचला असल्याने हा रस्ता प्रशांनसाठी धोकादायक बनला होता. त्यामुळे वाहतुकीसाठी आडथळा निर्माण होत होता. आनेक वहाने या रस्त्यावर आडकुन पडली होती.

तसेच आनंदवाडी – बांधखडक-तेलंगशी या गावाचा देखील खैरी नीदिला पुर आल्याने धोकादायक बनला होता. तसेच बांधखडक गावाकडे जाणार्‍या पुलावर देखील मोठ्या प्रमाणात पुर आल्याने गावचा दोन दिवस संपर्क तुटला होता. तसेच सदरचा पुल पुर्णपणे उखडला होता. पुलाखालील टाकलेल्या नळ्या पुर्ण पणे चॉकप झाल्या होत्या. याची दखल घेत बांधखडक येथील भाजपा युवा नेते व उद्योजक केशव (आण्णा) वनवे यांनी स्वतःच्या खर्चाने बांधखडक येथील पुल उखडला होता त्या ठिकाणी पडलेल्या खड्यांची लेवल करुन रस्ता दुरुस्ती केला. तसेच पुलाच्या चॉकप झालेल्या नळ्या जेसीबीच्या सहाय्याने मोकळ्या केल्या.

याच बरोबर जामखेड खर्डा रोडवरील दरडवाडी पुलाजवळ देखील पडलेले मोठे भगदाड त्यांनी स्वखर्चातून मशनीरी लावुन व मुरुम टाकुन घेतला व जामखेड खर्डा रस्त्याची वहातुक पुन्हा सुरळीत झाली. त्यामुळे बांधखडक व परीसरातील ग्रामस्थांनी केशव वणवे यांनी केलेल्या रस्ता दुरुस्तीमुळे समाधान व्यक्त केले आहे. यावेळी गावातील बांधखडक चे सरपंच राजेंद्र कुटे, उपसरपंच तानाजी फुंदे, रोहीदास वनवे, अंकुश वारे अर्जुन दराडे, विजय वारे, बालाजी वनवे व ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

गेल्या दोन तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे बांधखडक कडे जाणारा दुसरा मार्ग दरडवाडी-चव्हाण वस्ती-बांधखडक हा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे वाहुन गेला आहे. दोन तीन दिवसांपासून हा रस्ता बंद असल्याने प्रशासनाने तातडीने हा रस्ता दुरुस्ती करावा अशी मावगणी चव्हाणवस्ती व बांधखडक येथील ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here