जामखेड-खर्डा रोडवरील दरडवाडी पुलाजवळ पडले मोठे भगदाड, जामखेड-खर्डा राज्यमार्गावर वहाने सावकाश चालवा

जामखेड प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून जामखेड तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जामखेड-खर्डा रोडवरील दरडवाडी येथिल पुलाजवळ मोठे भगदाड पडले आहे. या पुलाचे काही कठाडे देखील तुटले आहेत. त्यामुळे सध्या हा पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पुलाजवळ रस्ता खचला असल्याने सध्या या पुलावरून एकेरी वहातुक सुरु आहे. लवकरच या रस्त्याची दुरुस्ती करुन वहातुक पुन्हा पुर्वरत होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत सूतार यांनी दिली आहे.

जामखेड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक घरांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. मोहरी तलावाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खैरी नदीला पूर आला आहे. याच अनुषंगाने जामखेड-खर्डा राज्य मार्गावरील दरडवाडी येथील जूना दगडी पुलावर मोठा खड्डा पडला आहे. या मार्गावर जामखेड भुम धाराशिव तुळजापूर व बार्शीकडे जाणाऱ्या प्रवाशांनी काळजी पुर्वक आपली वहाने चालवावीत कारण या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

दरडवाडी पुलाच्या जवळच मोठे भगदाड पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने लवकरात लवकर या ठिकाणी रस्त्याची दुरूस्ती करुन पुन्हा वहातुक सुरळीत करण्यात येणार आहे. मात्र तोपर्यंत नागरीक व प्रवाशांनी सध्या रेड अर्लट जारी आसल्याने पाणी आलेल्या भागातील पुलांनवरुन वहाणे चालवु नयेत तसेच आपली काळजी घ्यावी असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत सूतार तसेच खर्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी नागरिकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here