

जामखेड-भुम रोडवर एसटी-टेम्पोची समोरासमोर धडक; टेम्पो चालक जागीच ठार
भूम : जामखेड-भुम रोडवर भुम हद्दीत एसटी व आयशर ( टेपो ) यांची ठिकाणी जोराची धडक बसून टेम्पो चालक जागेवरच ठार झाला .व एसटी चा एक तांत्रिक कामगार गंभीर जखमी झाला असून इतर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

अधिक माहिती अशी की ता. १८ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जामखेड – भुम रोडवरील पाथ्रुड जवळील बावी गावाजवळील भालेराव वस्ती या ठिकाणी टेम्पो व एसटीची जोराची धडक बसली. त्यानंतर एसटी एका झाडावर जाऊन आदळली. या अपघातात टेम्पो चालक जागेवरच ठार झाला.

भुम डेपोची एक बस खडकत या ठिकाणी नादुरूस्त झाली होती. ती बस बंद पडल्याने तीला जामखेड येथील अगारात काल दि 18 रोजी दुरुस्ती आणले होते. यानंतर ही बस जामखेड एसटी आगारातून घेऊन जाण्यासाठी भुम डेपोचे ३ तांत्रिक कामगार, बस क्रमांक एम एच २० बी एल २८०५ दुरुस्त करून भूम कडे घेऊन चालले होते. यावेळी बुधवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास एम एच. २५ ऐ जे ४८७३ हा आयशर ( टेम्पो ) हा पुणे येथे माल भरण्यासाठी भूम कडून जात होता .

यावेळी जामखेड – भुम रोडवरील बावी गावाजवळ या दोघांची समोरासमोर ड्रायव्हरच्या बाजूने धडक बसल्याने आयशर टेम्पोचा कन्हेरी, ता. वाशी येथील चालक गणेश मधुकर मगर ( वय २२ ) हा जागीच ठार झाला .बस मधील तांत्रिक कामगार सतीश दिवटे यांना भूम ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार घेऊन अति गंभीर असून त्यांना बार्शी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तर भुम डेपो अगाराचे कृष्णा शेटे ,स्वप्निल सरवदे तांत्रिक कामगार यांना किरकोळ जखमी झाल्याने खाजगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे .एसटीचे नागेश गायकवाड ट्रॅफिक इन्स्पेक्टर ,गणेश वाघमारे सीनियर लिपिक ,एम ए सानप वाहतूक नियंत्रण ,बाजीराव जगदाळे हेड मेकॅनिक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.





