हॉटेलमध्ये नॉनव्हेज खाताय ? सावधान ! राहुरीत २ हॉटेलमध्ये शिजवलं जात होतं गोमांस, पोलिसांत गुन्हा दाखल

राहुरी प्रतिनिधी

राहुरी तालुक्यातील गुहा येथे नगर-मनमाड मार्गावर असलेल्या दोन हॉटेलमध्ये गोवंशिय जातीचे शिजलेले मांस मिळून आले आहे. हा धक्कादायक प्रकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणी ६ हजार ७५० रुपयांचे ४५ किलो गोवंश जातींचे मांस जप्त करून हॉटेल मालका विरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ जून रोजी राहुरी पोलीस ठाण्यात पोलिस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके, पोलीस नाईक प्रविण आहीरे, पोलिस कॉन्स्टेबल अंकुश भोसले ड्युटीवर असताना नगर मनमाड जाणारे रोडच्या कडेला गुहा शिवारातील हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवात मास विक्री करण्यात येत असल्याचा डायल ११२ वर कॉल आला असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

गुहा गावच्या शिवारातील हॉटेल मेवात व हॉटेल राणी मेवात एक इसम हा एका पातेल्यातून शिजलेले मांस बाहेर काढीत असताना दिसून आला. त्यास नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मोहम्मद अली मोहम्मद सहून (राहणार. नई ता जि. मेवात, राज्य हरीयाना) असे असल्याचे सांगीतले. त्यावेळी पोलीसांनी त्यास पातेल्यात काय आहे असे विचारले असता त्याने सदर पातेल्यात गोवंशिय जातीचे मांस असल्याचे सांगीतले.

यावेळी पोलिसांनी दोन्ही कारवाईत ६ हजार ६५० रुपये किंमतीचे ४५ किलो गोवंश जातीच्या जनावरांचे गोमांस करून जप्त करत त्यातील काही मांस केमिकल तपासणी करिता राखीव ठेवून उर्वरित मांस जागीच नष्ट केले आहे. याबाबत पोलीस नाईक प्रवीण बागुल यांच्या फिर्यादी वरून हॉटेल राणी मेवात व हॉटेल मेवातचा मालक मोहम्मद अली मोहम्मद सहुन याच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शक सुरू आहे. कोल्हार, गुहा व परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या कार्यकर्त्यांचे हिंदू समाज बांधवांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here