बियाणे वाटपात सीएससी केंद्रचालकांची भूमिका संशयास्पद, कारवाई करण्याची सुनील लोंढे यांची मागणी
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील कृषी विभागाच्या भोंगळ कार्भारावर ताशेरे ओढत तालुक्यातील सीएससी केंद्र चालक व कृषी विभागाच्या कर्मचार्यांवर संशय व्यक्त करत कार्यवाही करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांनी निवेदनाद्वारे केली.
सध्या खरीप हंगामाच्या पेरणीचे दिवस व चालू असलेल्या पावसामुळे शेतकरी आधीच मेटाकुटीला आला असता त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेले निवेदनद्वारे कृषी विभागाच्या कारभाराची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदन म्हटले की, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या खरीप पीक पेरण्यासाठी १०० टक्के बियाणे अनुदानावर उपलब्ध करून दिले होते. परंतु त्यामध्ये ऑनलाईन करणे बंधनकारक होते. जे शेतकरी प्रथम ऑनलाईन करतील त्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे धोरण होते. पण याबाबत कृषी विभागातून कसलेही प्रकारची जाहिरात (प्रसिद्धी) करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही चांगली योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजले नाही हे सर्व गुप्त पद्धतीने झाल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ कृषी विभागातील अधिकारी, कर्मचार्यांनी आपल्या नातलगाच्या नावाने प्रथम ऑनलाईन केले, त्यामध्ये सी.एस. सी केंद्र चालकांची खूप मोठी भूमिका आहे. त्यांनी इतर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी केलेली नाही. त्यांनी शेतकर्यांना आज रेंज नाही, उद्या या, रात्री या अशा प्रकारचे उत्तरे देऊन त्यांचे ऑनलाईन टाळले. त्यांनी आपल्याच घरातील जवळच्या नातेवाईक यांच्या नावे ऑनलाईन करून त्याची लाभ ठराविक लोकांना घेतला आहे..
या विषयावर तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षक यांचीशी संपर्क केला असता त्यांनीही योजना चुकीची असल्याचे सांगितले. या योजनेमुळे सी. एस. सी. केंद्र चालकच भविष्यात याचा लाभ घेऊ शकतात. तेव्हा शेतकरी चळवळीच्या माध्यमातून वरील प्रकारची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यात यावी. विशेष म्हणजे ठराविक गावाला त्या योजनेचा लाभ मिळाला आहे व सी.एस. सी. केंद्र चालकांच्या नातेवाईकांना त्याचा लाभ झालेला आहे. तरी या प्रकारची सखोल चौकशी करून जे जे अधिकारी सी. एस. सी. केंद्र चालक दोशी असतील यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.