Home क्राईम न्यूज एका अपघातामधून वाचले पण दुसर्‍या आपघातातील ट्रकने चिरडले, सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

एका अपघातामधून वाचले पण दुसर्‍या आपघातातील ट्रकने चिरडले, सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

एका अपघातामधून वाचले पण दुसर्‍या आपघातातील ट्रकने चिरडले, सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू

बीड जिल्ह्यात मध्यरात्री भीषण अपघात, सहा जण जागीच ठार

बीड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. यात बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय.

याबाबत अधिक माहिती अशी की गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला होता. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक दिली आणि यात यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचे समोर आले आहे.

एका अपघातामधून वाचले पण दुसर्‍या आपघातातील ट्रकने सहा जणांना चिरडले, पुढे आलेल्या माहितीनुसार, बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला असून एका जण गंभीर जखमी झाला आहे. तसचे जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थाळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराईवर शोककळा पसरली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!