जामखेड येथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या 3 आरोपींना अटक, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथे स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने आठ ते दहा जणांच्या टोळक्याने एका तरुणास मारहाण करून अकरा लाख रुपयांना लुटले होते. ही घटना जामखेड कुसडगाव रस्त्यावर भरदिवसा घडल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यातील तीन दरोडेखोरांना अटक करण्यात यश आले आहे.

आरोपी सोन्या शिवाजी काळे वय 28 अभित्या शिवाजी काळे वय 32 (दोन्ही रा.सरफडोह ता. करमाळा जिल्हा सोलापूर व शुभम रामचंद्र पवार वय 18 रा. सरदवाडी ता.जामखेड जि.अहिल्यानगर आशा तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनकडुन मिळालेली माहिती अशी की फीर्यादी राजेंद्र दिलीप मैड रा. आश्वी ता.संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना लुटणारे आरोपी हे दि 15 मे 2025 रोजी जामखेड तालुक्यातील जवळा या ठिकाणी येणार आहेत आशी माहिती मिळाली तसेच या घटनेत गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा आरोपी विकास काज्या काळे, जरेणी विकास काळे, दोन्ही रा.पोंदवडी ता. करमाळा, वनिता रामचंद्र पवार, रा. सरदवाडी ता. जामखेड, सोन्या शिवाजी काळे, रा. सदफडोह ता. करमाळा अशांनी त्यांच्या साथीदारासह केला असल्याची माहिती मिळाली. यानंतर पथकाने जवळा या ठिकाणी छापा टाकल्या नंतर आरोपी सोन्या शिवाजी काळे, वय 28 अभित्या शिवाजी काळे, वय 32 (दोन्ही रा.सरफडोह ता. करमाळा जिल्हा सोलापूर व शुभम रामचंद्र पवार वय 18 रा. सरदवाडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर आशा तीघांना जेरबंद करण्यात आले आहे.

या तिनही आरोपींनकडे पथकाने चौकशी केली असता सदरचा गुन्हा गुन्हा हा 1)विकास काज्या काळे (फरार) 2) जरेणी विकास काळे (फरार) 3)लालासाहेब काज्याकाळे (फरार) 4)किरण काज्या काळे (फरार) अक्र.4 ते 7 रा.पोदवडी, ता.करमाळा, जि. सोलापूर ८) वनिता रामचंद्र पवार, रा.सरदवाडी, ता. जामखेड (फरार) ९) दिक्षा रामचंद्र पवार, रा. सरदवा्डी, ता.जामखेड (फरार) १०) सुनिल शिवाजी काळे, रा. सरफडोह, ता करमाळा, जि. सोलापूर (फरार) ११) रेश्मा सुनिल काळे, रा. सरफडोह, ता. करमाळा, जि. सोलापूर (फरार) अशांनी मिळून केला असल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढ़ील तपास जामखेड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अहिल्यानगर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खेरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे कर्जत यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर व अंमलदार यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here