जामखेड रोखठोक
गेल्या दोन महीन्यांपासून तालुक्यात कोरोनाचा हाहाकार माजला होता. रुग्ण संख्या देखील कमी होताना दिसुन येत नव्हती. अनेकांना आपला प्राण गमवावा लागला होता. आखेर व्यापारी व प्रशासनाने च्या माध्यमातून घोषित करण्यात आलेल्या जनता कर्फ्यू चा परीणाम दिसुन येत आहे. गेल्या आठ दिवसांपासून जामखेड तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या घटत चालली आसल्याचे दिसुन येते आहे.
दोन महिन्यांपासून तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच चालला होता. अॉक्टव कोरोना रुग्णांची संख्या वाढत जाऊन ती ९०० च्या घरात जाऊन पोहचली होती. तर पॉझिटिव्हचा रेट देखील ३० टक्क्यांनवर जाऊन पोहचला होता. त्यामुळे प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यानसमवेत बैठक घेऊन तातडीने दहा दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला. याचा परीणाम देखील दिसुन आला. तसेच आरोग्य विभागाकडून टेस्टींग वाढवण्यात आल्या. ९ तारखेपासून ते १८ तारखेपर्यंत जवळपास एक हजार जणांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे पॉझिटिव्हीटीचा रेट ३० टक्क्यांनहुन १० टक्क्यांनवर आला आसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुनील बोराडे यांनी दिली आहे.
तालुक्यात ९०० च्या घरात अॅक्टव रुग्णांची संख्या जाऊन पोहचली होती. मात्र सध्या जामखेड तालुक्यात आठ दिवसांत ती कमी होऊन ५८१ अॅक्टव रुग्ण उपचार घेत असुन पुढील आठ दिवसात देखील कोरोना रुग्णांची संख्या कमी होणार आसल्याची माहिती आरोग्य विभागाकडुन देण्यात आली आहे. मात्र रुग्णसंख्या कमी होत आसली तरी कोणाचे नियम पाळावेच लागतील अशी माहिती प्रशासनाकडु देण्यात आली आहे.






