जामखेड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक सुरज मुंढे निलंबित, एका महीन्यातच दुसरा कर्मचारी निलंबित

जामखेड प्रतिनिधी

पंचायत समिती कार्यालयात काम करत असताना अनाधिकृतपणे गैरहजर रहाणे, कार्यालयीन कामकाजात हलगर्जिपणा करणे, तसेच वरिष्ठांच्या आदेशाचे अवमान करणे अशा प्रकारचे गैरवर्तन केल्या प्रकरणी जामखेड पंचायत समिती मधील कर्मचारी, कनिष्ठ सहाय्यक सुरज मुंढे यास मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांनी निलंबनाचा आदेश काढला आहे. एका महीन्यातच दुसरा कर्मचारी निलंबित झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या महिन्यात जिवंत व्यक्तीला मयत दाखवले तसेच कामात हलगर्जीपणा यामुळे एका ग्रामसेवकाचे निलंबन करण्यात आले होते. महिन्याभरात पुन्हा जामखेड पंचायत समिती मधील कर्मचारी कनिष्ठ सहाय्यक मुंढे सुरज दिलावर, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) पंचायत समिती जामखेड येथे कार्यरत असताना अनाधिकृत गैरहजर रहाणे, कार्यालयीन कामकाजात हलगर्जिपणा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे अवमान करणे, अशाप्रकारचे गैरवर्तन केलेले आहे. सदर बाब ही कार्यालयीन शिस्तीचे उल्लघंन करणारी आहे.

मुंढे हे जिल्हापरिषद कर्मचारी असुन त्यांनी सदैव निरपवाद, सचोटीने व कर्तव्य परायण असणे आवश्यक आहे. तथापि कर्तव्याचे पालन न करुन गैरवर्तन केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ चे नियम ३ चा भंग झालेला आहे. त्या अर्थी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ३ मध्ये दिलेल्या तरतुदीस अधिन राहुन मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन या आदेशा द्वारे  मुंढे सुरज दिलावर, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) पंचायत समिती जामखेड, यांना सदर आदेशाच्या दिनांका पासून जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करीत आहे.

आणखी असाही आदेश देण्यात येत आहे की, हा आदेश आमलात राहील तेवढया कालावधीत मुंढे सुरज दिलावर, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) पंचायत समिती जामखेड, यांचे मुख्यालय पंचायत समिती पारनेर येथे राहिल मुंढे सुरज दिलावर, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) पंचायत समिती जामखेड, यांना गरविकास अधिकारी पंचायत समिती पारनेर यांच्या पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.

मुंढे सुरज दिलावर, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) पंचायत समिती जामखेड, यांना महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी स्वीयत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतुन काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम १९८१ मधील नियम ६८ च्या तरतुदी नुसार निलंबन भत्ता व पुरक भत्ते देण्यात यावेत.

निलंबनाच्या कालावधीत  मुंढे सुरज दिलावर, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) पंचायत समिती जामखेड, यांनी खाजगी नोकरी स्विकारु नये त्यांनी तसे केल्यास ते दोषारोप त्यांचे वर ठेवण्यात येईल तसेच ते निंलबन निर्वाह भत्ता गमविण्यास पात्र ठरतील असे आदेशात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here